हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत याना मतदारसंघात येऊ नका म्हणत १० वेळा फोन केले असा आरोप आमदार राम शिंदे यांनी केल्यानंतर रोहित पवारांनी ट्विट करत जशास तस प्रत्युत्तर दिले आहे. यावेळी रोहित पवारांनी राम शिंदे यांच्या आरोपाला प्रत्युत्तर देताना तानाजी सावंत यांचा मात्र शेलक्या शब्दात समाचार घेतला आहे.
ज्याला पैसा आणि अहंकाराची खाज आहे. ज्याला हाफकिन संस्था आहे की व्यक्ती हेही माहिती नाही, जो महाराष्ट्राला भिकारी बनवण्याची भाषा करतो, अशा व्यक्तीला मतदारसंघात न येण्यााठी मी कशाला मस्का लावू? राम शिंदे साहेब, पु्ड्या सोडू नका. खेकड्याची चाल लोक स्वीकारत नाहीत. हिंमत असेल, तर याचा पुरावा द्या आणि यापुढे तुमच्याच प्रचाराला त्यांना जरूर बोलवा. मग मैदानात बघू असं म्हणत
— Rohit Pawar (@RRPSpeaks) October 29, 2022
राम शिंदे आणि रोहित पवार यांच्यात सातत्याने आरोप -प्रत्यारोप होताना दिसत असतात. मात्र आता रोहित पवारांनी राम शिंदेंवर प्रत्युत्तर देताना तानाजी सावंत यांचा ज्या प्रकारे समाचार घेतला ते पाहता भविष्यात तानाजी सावंत आणि रोहित पवार यांच्यातील वादही पेटण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच तानाजी सावंत यांनी अहमदनगर येतेच रोहित पवारांवर केली होती. येत्या 2024 ला हातात झाडू घेऊन हा मतदारसंघ आपल्याला साफ करायचा आहे असं ते म्हणाले होते.