आंबेठाण | ‘शिरुर मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे मोठे काम आहे. तेव्हा पवार यांचे नातू आणि पुणे जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार यांना शिरुर मतदार संघातून आगामी लोकसभेसाठी तिकिट द्यावे’ अशी मागणी राष्ट्रवादी माजी आमदार दिलीप मोहिते यांनी केली. रोहित पवार आगामी लोकसभेत शिवसेनेच्या आढळरावांना पुरून उरतील असा विश्वास मोहिते यांनी यावेळी व्यक्त केला. सावरदरी येथे स्वराज्य पॅकेजिंग इण्डस्ट्रीजच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी रोहित पवार देखील उपस्थित होते.
‘आढळराव हे निष्क्रिय खासदार आहेत. त्यांचा पराभव करण्यासाठी पवार साहेबांची गरज नाही. आढळरावांसाठी त्यांचे नातूच काफी आहेत’ असं म्हणुन मोहिते यांनी आगामी लोकसभेसाठी शिरुर मतदार संघाकरता रोहित यांचे नाव सुचवून एकच खळबळ उडवून दिली. यावेळी बोलताना ‘खेड परिसरात शरद पवारांचे मोठे काम आहे. चाकण ला एम.आय.डी.सी. आणण्यात साहेबांचा खारीचा वाटा आहे. तेव्हा रोहित यांना आमच्या भागातून उमेदवारी देऊन पवार कुटूंबियांच्या त्रणातून मुक्त होण्याची संधी आम्हाला संधी द्यावी’ असे मत व्यक्त केले.
दरम्यान याअगोदर अजित पवार यांवे चिरंजिव पार्थ निवडणुक लढवणार असल्याच्या चर्चेला उधान आले होते. खुद्द मोठ्या पवारांनी पार्थला उमेदवारी नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर आता रोहीत यांच्या उमेदवारीबद्दल चर्चा सुरु आहे. मात्र रोहित पवार स्वत: या विषयावर काहिच बोलताना दिसत नसुन येणार्या काही दिवसांतच काय ते स्पष्ट होईल असे एकंदरित चित्र आहे.
दिवसभराच्या ताज्या घडामोडी आणि हटके लेख घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.
Facebook Page – Hello Maharashtra
इतर महत्वाचे –
दादा कोंडके आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यातला याराना तुम्हाला माहीती आहे का?
जेव्हा शरद पवारांचे नातू रोहित पवार धारावीत जातात…
शरद पवारांच्या गुगली समोर पृथ्वीराज चव्हाण क्लीन बोल्ड
शरद पवारांनी मला कळकळून मिठी मारली आणि सांगीतलं तुम्ही आमचेच आहात – उदयनराजे भोसले