संविधानानुसार काम करण्यासाठी आपणास.. ; राज्यपालांच्या वाढदिवसानिमित्त रोहित पवारांच्या खोचक शुभेच्छा

0
128
Rohit pawar koshyari
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांचा आज वाढदिवस असून देशभरातून त्यांच्यावर शुभेच्छा चा वर्षाव होत आहे. महाविकास आघाडी आणि राज्यपाल यांच्यात गेल्या काही दिवसापासून संघर्ष पाहायला मिळाला होता. याच दरम्यान, कोशारी यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी त्यांना खोचक शब्दांत शुभेच्छा दिल्या आहेत,

छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यासारख्या अनेक कर्तृत्ववान राष्ट्रपुरुष व महनीय व्यक्तींचा समृद्ध वारसा लाभलेल्या महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल महोदय श्री. भगतसिंग कोशारी साहेब आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! घटनात्मक प्रमुख म्हणून संविधानानुसार काम करण्यासाठी आपणास ‘बारा’ हत्तीचं बळ मिळो आणि आपणांस दिर्घायुष्य लाभो ही सदिच्छा! अस ट्विट रोहित पवार यांनी केले.

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील थेट राजभवनात जाऊन राज्यपालांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. त्यांनी ट्विटरवर फोटोही शेअर केले. मुंबई येथे राजभवनात राज्यपाल मा. भगतसिंह कोश्यारी जी यांची सदिच्छा भेट घेतली; त्यांना वाढदिवसाच्या मनापासनं शुभेच्छा दिल्या. यावेळी विधानपरिषदेचे सभापती मा. रामराजे नाईक निंबाळकर साहेब देखील उपस्थित होते,” असे अजित पवार म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here