कर्जत प्रतिनधी | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे लाडके नातू रोहित पवार यांची उमेदवारी आता धोक्यात आली आहे. कारण कर्ज जामखेड हि जागा काँग्रेसकडे आहे. त्यामुळे रोहित पवार यांना उमेदवारी देण्यास काँग्रेस आता आडकाठी करू लागले आहे. कर्जत जामखेडच्या जागी आम्हीच लढणार हि जागा आम्ही राष्ट्रवादीला सोडणार नाही असा पवित्रा काँग्रेसने घेतल्याने रोहित पवार यांच्यासमोर आता चिंतेचे ढग उभा राहू लागले आहेत.
राधाकृष्ण विखे पाटलांच्या विरोधात काँग्रेसकडून या तरुण नेत्याला उमेदवारी?
रोहित पवार यांनी या भागात पाणी टंचाईच्या काळात पाण्याचे टँकर पुरवून येथील दुष्काळग्रस्तांची तहान भागवली आहे. त्याच प्रमाणे त्यांचा या भागात संपर्क देखील तगडा झाला आहे. रोहित पवार छोट्या छोट्या व्यापाऱ्यांना, दुकानदारांना भेटून लोकांच्या समस्यांबद्दल विचारविमर्श करू लागले आहेत. त्याच प्रमाणे त्यांनी या भागात अकस्मात मृत्यु झालेल्या लोकांच्या कुटुंबाला भेट देऊन त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा देखील प्रयत्न केला आहे. अशा सर्व लोकसंपर्कातून रोहित पवार यांनी उमेदवारीसाठी चांगली पृष्ठभूमी निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. अशा परिस्थितीत रोहित पवार यांना इथून उमेदवारी नाही मिळाली तर मात्र त्यांच्या अपेक्षणांवर पाणी फेरले जाणार आहे.
सी.सी.डि या नामांकित कॉफी कॅफेचे मालक गायब
दरम्यान पंचायत समितीच्या माजी सभापती मीनाक्षी साळुंखे यांनी देखील या मतदारसंघातून उमेदवारी मागितली आहे. स्थानिकचा उमेदवार असताना बाहेरचा उमेदवार या ठिकाणी कशासाठी उभा करायचा असा सवाल देखील स्थानिकांचे लोक विचारू लागले आहेत. त्यामुळे रोहित पवार यांच्या उमेदवारीवर आलेले हे सावट कसे दूर होणार हे देखील पाहण्यासारखे असणार आहे.
गणेश नाईकांचा भाजप प्रवेश ठरला ; या दिवशी करणार प्रवेश?
इंदापूरच्या जागेवरून पुन्हा काँग्रेस राष्ट्रवादीत कलगीतूर ; जागा सोडण्यास शरद पवारांचा नकार
गणपतराव देशमुखांची विधानसभा निवडणुकीतून माघार ; या कारणामुळे निवडणूक लढणार नाहीत