जुन्नर : हॅलो महाराष्ट्र – जुन्नरच्या एका सभेत मनमोकळे पणाने बोलताना राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी 2024 नंतर तरुणांच्या हाती राजकारणाची सूत्रे असतील असे सूचक विधान त्यांनी यावेळी केले. एवढेच नाहीतर तर राष्ट्रवादीचे अध्य्क्ष शरद पवार आणि अजित पवार हे मार्गदर्शकाच्या रूपात असतील पण निर्णय आपल्याला घ्यावा लागेल असेदेखील रोहित पवार (Rohit Pawar) यावेळी म्हणाले. त्यांच्या या वक्तव्याने राष्ट्रवादीमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
रोहित पवार नेमके काय म्हणाले ?
2024 नंतरची वेळ युवकांची आहे. हि वेळ आमची आहे. त्याठिकाणी आपल्या सर्वांबरोबर राहून आपल्याला आपल्या विचारांचे सरकार 2024 ला कसे येईल यासाठी मनापासून काम करायचे आहे. आणि जेव्हा आपली वेळ त्याठिकाणी येते, तेव्हा निर्णयसुद्धा आपल्यालाच त्या ठिकाणी घयावे लागतात. त्यावेळी निर्णय आदरणीय पवार साहेब असतील, दादा असतील यांचे मार्गदर्शन असेलच पण काय पद? कसं काय? काय करायचं ? कुणाला काय करायचं ? त्या ठिकाणी हि नवीन पिढी त्या ठिकाणी हे निर्णय घेईल असे रोहित पवार (Rohit Pawar) भरसभेमध्ये म्हणाले.
रोहित पवारांचे (Rohit Pawar) हे विधान भविष्य दर्शक सूचक विधान आहे. आता शरद पवार, अजित पवार, पार्थ पवार तसेच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आमदार रोहित पवारांच्या या विधानाकडे कशा रीतीने पाहतात याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. रोहित पवारांच्या (Rohit Pawar) अगोदर अजित पवार यांनीदेखील अशाच प्रकारचे सूचक वक्तव्य केले होते.
हे पण वाचा :
‘या’ सरकारी योजनेमध्ये फक्त 1,000 रुपयांच्या गुंतवणूकीद्वारे मिळवा दुप्पट पैसे !!!
येत्या निवडणुकीत भाजपसोबत युती करणार का?; राजू शेट्टींनी दिलं ‘हे’ उत्तर
सोमय्यांनी ठाकरेंबद्दल बोलू नये, अन्यथा आम्हांला सत्तेची पर्वा नाही; बंडखोर आमदार आक्रमक
2022 मध्ये ‘या’ तीन शेअर्सने दिला 3,000 टक्क्यांपर्यंत रिटर्न !!!
संजय राऊतांच्या विरोधात अटक वॉरंट जारी; नेमकं काय आहे प्रकरण?