हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Roman Saini : आयुष्यात यशस्वी होण्यासाठी प्रत्येकाला काही ना काही करायचे असते. यासाठी कोणी इंजिनिअर बनतो तर कोणी डॉक्टर तर कोणी सरकारी अधिकारी बनून प्रशासनात हातभार लावतो. मात्र अशीही काही लोकं आहेत जे इतरांसारखा पारंपरिक विचार न करता थोडा वेगळा मार्ग पत्करून एक मोठा पायंडा पाडतात.
आज आपण अशाच एका व्यक्ती बाबत जाणून घेणार आहोत ज्याचे नाव आहे Roman Saini. जे डॉक्टर आहेत. तसेच सैनी यांनी IAS अधिकारी म्हणूनही काम केले आहे. त्याबरोबरच आता ते एक यशस्वी उद्योजक देखील आहेत. भरपूर टॅलेंट असलेल्या रोमन सैनी यांनी वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी सर्वांत अवघड मानली जाणारी AIIMS ची परीक्षा दिली.
वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी AIIMS ची प्रवेश परीक्षा पास केल्यानंतर ते IAS बनले. 7 वर्षांपूर्वी त्यांनी अचानक नोकरी सोडली आणि स्वत:ची Unacademy नावाची कंपनी सुरु केली केली. त्यावेळी त्यांच्या या निर्णयाने अनेकांना धक्काच बसला. रोमन हे राजस्थानचे रहिवासी असून त्यांचे वडील इंजिनिअर तर आई गृहिणी आहेत.
आपले एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर Roman Saini यांनी NDDTC, AIIMS मध्ये ज्युनिअर रेसिडन्स म्हणून काम केले. कोणत्याही तरुणासाठी हे एक दिवा स्वप्नापेक्षा कमी नाही. मात्र अवघ्या सहा महिन्यातच रोमनने ही नोकरी सोडली आणि IAS अधिकारी होण्यासाठी अभ्यास सुरु केला.
यानंतर Roman Saini नी वयाच्या 22 व्या वर्षीच अवघड मानली जाणारी IAS परीक्षा पास केली. यानंतर वयाच्या 23 व्या वर्षी तर प्रशासकीय अधिकारी बनले. त्यांनी या परीक्षेत संपूर्ण देशात 18 वा क्रमांक पटकावला. यानंतर ते मध्य प्रदेशात जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाले होते. मात्र IAS अधिकारी म्हणूनही त्यांनी फार काळ काम केले नाही.
यानंतर तरुणांना चांगले शिक्षण देण्यासाठी त्यांनी Unacademy नावाची कंपनी स्थापन केली. ज्याचे मुख्यालय बंगलोर येथे आहे. जिथे नागरी सेवांसह 35 वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेतली जाते. आज या कंपनीचा कारभार तब्ब्ल 15,000 कोटींच्या घरात आहे. Unacademy हे ऑनलाइन एज्युकेशन प्लॅटफॉर्म आहे. यूट्यूब आणि ऍप वर तरुणांमध्ये Unacademy खूपच लोकप्रिय आहे.
लाखो रुपये खर्च न करताही विद्यार्थ्यांना UPSC कोचिंगसाठी योग्य प्लॅटफॉर्म मिळावे, ही Unacademy च्या स्थापनेमागील मूळ कल्पना होती. याद्वारे रोमन सैनी आज देशातील हजारो गरीब मुलांना नागरी सेवा परीक्षेची ऑनलाइन तयारी करण्यास मदत करत आहेत.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://unacademy.com/
हे पण वाचा :
Fixed deposits : आता ‘या’ स्मॉल फायनान्स बँकेनेही FD वरील व्याजदरात केली वाढ !!!
Upcoming cars : इलेक्ट्रिक आणि SUV सहित जूनमध्ये लॉन्च होणार ‘या’ 4 सर्वोत्कृष्ट कार !!!
EPFO : कोट्यवधी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी !!! आता व्याजाचे पैसे लवकरच खात्यात जमा होणार
HDFC : ‘या’ कंपनीच्या होम लोनवरील व्याजदरात एका महिन्यात तिसऱ्यांदा वाढ !!!
Gold Price Today : सोने महागले तर चांदीमध्ये झाली घट, आजचे नवीन दर पहा