हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एकनाथ शिंदे यांच्या सोबतच्या बंडखोर मंत्र्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दणका दिला आहे. बंडखोर मंत्र्यांच्या खात्यांमध्ये फेरबदल करण्यात आले आहेत. जनहिताची कामे अडकून न राहता ती अविरतपणे सुरू राहण्यासाठी आणि राज्याचा कारभार व्यवस्थित पार पडण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हा मोठा निर्णय घेतला आहे.
यानुसार, एकनाथ शिंदे यांचे नगरविकास खाते सुभाष देसाई यांना सोपविण्यात आले आहे. गुलाबराव पाटील यांचे खाते अनिल परब यांच्याकडे देण्यात आले आहे. दादा भुसे यांचे कृषी खाते शंकरराव गडाख यांच्याकडे सोपविण्यात आल आहे. बच्चू कडू यांच्याकडील खाते आदिती तटकरे याना दिले आहे. उदय सामंत यांच्याकडील खाते आदित्य ठाकरे यांना देण्यात आलं आहे. तर अब्दुल सत्तार यांचे खाते प्राजक्त तनपुरे यांच्याकडे सोपविण्यात आले आहे.
जेव्हा एखाद्या मंत्र्याला आपली कामे पार पाडणेशक्य नसेल तेव्हा त्या मंत्र्याच्या अनुपस्थितीत मुख्यमंत्र्यास इतर कोणाही मंत्र्याला त्याची सर्व किंवा काही कामे पार पाडण्याबाबत निदेश देता येईल अशी तरतूद आहे त्याप्रमाणे हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता बंडखोर आमदारांचा एकप्रकारे दणका बसला आहे.