Royal Enfield Hunter 350 : दमदार फिचर्स आणि स्टाइलिश लूकसह लॉंच होणार hunter 350 बुलेट

Royal Enfield Hunter 350
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । स्पोर्ट बाईकचे (Royal Enfield Hunter 350) चाहते असलेल्यांसाठी आनंदाची बातमी आहे. लक्झरी बाईक निर्माता कंपनी Royal Enfield ची नवीन बाईक म्हणजेच Royal Enfield Hunter 350 हि 7 ऑगस्टला भारतात लॉन्च होणार आहे. ही बुलेट रॉयल इनफिल्डची सर्वात स्वस्त बाईक असून गाडीचा नवा कूल आणि डिझाईन खूप आकर्षक आहे. आज आपल्या बाईक रिव्हिव्ह मध्ये जाणून घेऊया या दमदार बुलेटचे खास फीचर्स..

Royal Enfield Hunter 350

डिझाईन- 

रॉयल एनफील्ड हंटर 350 ची लांबी 2,055 mm, रुंदी 800 mm आणि उंची 1,055 mm असेल. या बुलेटचा व्हीलबेस 1,370 मिमी आहे. डिझाईन बाबत बोलायचं झालं तर ही नवी बुलेट रॉयल एनफील्डच्या स्टॅंडर्ड डिझाईनपेक्षा वेगळी आहे. यात हंटर 350 सिग्नेचर रेट्रो बिट्सप्रमाणे राऊंट हँडलॅम्प, रियर व्ह्यू मिरर, आणि टेल लॅम्पसह उपलब्ध असेल. बेस व्हेरियंटमध्ये स्पोक व्हील, सिंगल-चॅनल एबीएस, रिअर ड्रम ब्रेक आणि हॅलोजन टर्न इंडिकेटरसह ट्यूब-टाइप टायर मिळतील. हाय व्हेरियंटमध्ये एलईडी टर्न इंडिकेटर, अलॉय व्हील आणि ड्युअल-चॅनल एबीएस मिळतील.

Royal Enfield Hunter 350

349cc इंजिन- (Royal Enfield Hunter 350)

गाडीच्या इंजिन बद्दल सांगायचं झाल्यास, रॉयल एनफील्ड हंटर 350 च्या सर्व व्हेरियंटमध्ये 349cc, फोर स्ट्रोक लाँग स्ट्रोक इंजिनचा वापर केला जाणार आहे. . हे इंजिन 20bhp पावर आणि 27Nm पीक टॉर्क जनरेट करेल. हे इंजिन (Royal Enfield Hunter 350)  5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स ला जोडलेलं असेल. यामध्ये फ्यूल इंजेक्शन, ओवरहेड कॅमशाप्ट आणि बॅलेंसर शाफ्ट देखील मिळेल.

किंमत-

अंदाजानुसार, या बुलेटची किंमत 1.70 लाख रुपयांच्या आसपास असू शकते जी क्लासिक 350 आणि Meteor 350 या दोन्हींपेक्षा कमी असेल. त्यामुळे रॉयल इन्फिल्ड Hunter 350 हि बुलेट सर्वात स्वस्त बुलेट म्हणून समोर येऊ शकते.

हे पण वाचा :

Simple One Electric Scooter : लवकरच बाजारात येणार Simple One इलेक्ट्रिक स्कुटर; 200 किमी पेक्षा जास्त Average

Ather 450x Gen 3 : Ather ने लॉंच केली दमदार इलेक्ट्रिक स्कुटर; पहा किंमत आणि फीचर्स

Citroen C3 Launch : दमदार फीचर्ससह Citroen C3ची भारतात धमाकेदार एन्ट्री; पहा काय आहे किंमत

BMW G310 RR : BMWने लाँच केली दमदार बाईक; पहा किंमत आणि फीचर्स

Bajaj Pulsar N160 : बजाजची Pulsar N160 नुकतीच लॉंच; पहा किंमत आणि फीचर्स