मुंबई । राज्य सरकारच्या गाडीचे फक्त स्टेरिंगच मुख्यमंत्र्यांच्या हाती आहे, मर्जी मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीची चालते असा टोला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी लगावला आहे. उद्धव ठाकरे नामधारी मुख्यमंत्री ठरले असून स्वतःच्या मना प्रमाणे तीन चाकी सरकारची गाडी ते चालवू शकत नाहीत.त्यांनी स्वतःच्या मनाने स्टीयरिंग फिरविण्याचा प्रयत्न केला तर काँग्रेस राष्ट्रवादी त्यांना तसे करू देणार नाही असेही आठवले म्हणाले. झी २४ तास या वृत्तवाहिनीनं याबाबत वृत्त दिलं आहे.
उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना अजित पवार यांनी ट्विट केलेल्या सूचक छायाचित्रामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या. शिवसेना खासदार संजय राऊत, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिल्या. आता आठवलेंनी यात उडी घेतली.
महाराष्ट्रात काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना यांचे ३ पक्षाचे तिघाडी सरकार अस्तित्वात आहे. मात्र कोणत्याही पातळीवर हे महाविकास आघाडी सरकार सक्षम ठरले नसून तिघाडी चे बिघाडी झालेले सरकार ठरल्याचा पुनरोच्चार आठवलेंनी केला. लॉकडाऊनच्या काळातही दलितांवर राज्यात अत्याचार वाढते राहिले आहेत. कोरोनाचे वाढते संकट रोखण्यात महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरल्याचे आठवले म्हणाले. कोणताही निर्णय ३ पक्षाचे सरकार एकमताने घेऊ शकत नाही. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे आपल्या मनाप्रमाणे त्वरित निर्णय घेऊन काम करू शकत नसणं अशी परिस्थिती आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”