हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यावर आरपीआयचे अध्यक्ष तथा खासदार रामदास आठवले यांनी आज निशाणा साधला आहे. वंचित आघाडीकडून मते खाण्याचे राजकारण केले जात असल्याची टीका खासदार आठवले यांनी केली आहे.
आरपीआयचे अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिवसेना पक्षाध्यक्ष तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आवाहनही केले. मंत्री आठवले म्हणाले की, 2024च्या निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. त्यामुळे शिवसेनेने हे नुकसान होऊ द्यायचे नसेल तर आताच सावध झाले पाहिजे. आणि त्यांनी भाजपसोबत युती करावी, असे आवाहन मंत्री आठवले यांनी केले.
मंत्री आठवले यांनी यावेळी चारोळीतून आरपीआयची आघाडी करण्याबाबतही मत व्यक्त केले. “लोक तर सगळे म्हणतात हाय हाय… लोक तर सगळे म्हणतात हाय हाय… रिपब्लिकन पक्षाच्या ऐक्याच काय? अशी चारोळी त्यांनी केली. मंत्री आठवले यांनी वंचित बहुजन आघाडीवर टीका करीत शिवसेनेला आघाडी करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे याची चरचा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.