हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि शिवसेना नेते संजय राऊत, आदित्य ठाकरे यांची भेट घेतली होती. ममता बॅनर्जीं व शरद पवार यांच्या भेटीवर आरपीआयचे अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी टोला लगावला आहे. “सर्व विरोधी नेते एकत्रित येऊन आघाडी करू पाहत आहेत. पण आम्हाला काही फरक पडणार नाही. नरेंद्र मोदींना सत्तेतून हलविणे हे कोण येऱ्यागबाळ्याचे काम नाही, असे आठवले म्हणाले.
लोणावळा येथे आज आरपीआय पक्षातील कार्यकर्त्यांच्या मेळावा पार पडला. या मेळाव्यानंतर मंत्री आठवले यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी आठवले यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भेटीबाबत मत व्यक्त केले. यावेळी आठवले म्हणाले की, केंद्रात असलेल्या मोदी सरकारच्या विरोधात सर्व विरोधी नेते एकत्रित येऊन आघाडी करू पाहत आहेत.
महाराष्ट्राच्या बाबतीत सांगायचे झाले तर महाराष्ट्रात नुकतीच शरद पवार आणि ममता बॅनर्जी यांच्यात बैठक झाली. ममतांनी इतर नेत्यांशीही बैठक घेत चर्चा केली. पण आम्हाला या बैठकीचा काही फरक पडणार नाही. नरेंद्र मोदींना सत्तेतून हलविणे हे कोण येऱ्यागबाळ्याचे काम नाही, असा टोलाही यावेळी मंत्री आठवले यांनी लगावलेला आहे.