…म्हणून राज ठाकरे मास्क घालत नसतील; आठवलेंनी व्यक्त केली ‘ही’ शंका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मास्कला केलेला विरोध सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून मास्क अनिवार्य केल्यानंतर देखील राज ठाकरे कुठेही फिरले तरी मास्क घालत नाहीत. दरम्यान आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी देखील यावर भाष्य करताना आपली प्रतिक्रिया दिली आहे.

आठवले म्हणाले, राज ठाकरे यांनी सरकारने दिलेले आदेश पाळले पाहिजेत. पण कदाचित राज ठाकरे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आदेश पाळायचा नसेल. त्यामुळे ते मुद्दाम मास्क वापरत नसतील,” अशी मिश्किल टिप्पणी रामदास आठवले यांनी केली. राज्यात मास्क न वापरणाऱ्या सर्वसामान्य लोकांवर जशी कारवाई होते, त्या पद्धतीने नेत्यावर देखील झाली पाहिजे,” असेही रामदास आठवले म्हणाले.

दरम्यान, राज ठाकरे मास्क का घालत नाहीत याच स्पष्टीकरण त्यांनी द्यावे असं संजय राऊत म्हणाले. जाणकार आहेत. लोकांचे नेते आहेत. मास्क का वापरू नये याच त्यांनी स्पष्टीकरण द्यावे अस संजय राऊत म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

Leave a Comment