हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना राष्ट्रपती पदासाठी उमेदवार करण्याचा घाट विरोधकांकडून घातला जात आहे अशी चर्चा जोरदार रंगली होती. यावर आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवारांना विरोधकांनी बळीचा बकरा बनवू नये असे आठवलेंनी म्हंटल आहे.
विरोधक शरद पवारांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून पुढे करत आहेत. पवार लढायला तयार असतील तर आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत, असं सांगतानाच पवार या निवडणुकीत विरोधकांच्या ताकदीवर निवडून येणार नाहीत. त्यामुळं त्यांचा विरोधकांनी बळीचा बकरा करू नये, असं मत रामदास आठवले यांनी व्यक्त केलं आहे.
राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत मी उमेदवार नाही – पवार
दरम्यान, शरद पवारांनी मात्र हे वृत्त फेटाळून लावले आहे. मी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार असेल हे अगदी चुकीचे आहे. 300 पेक्षा जास्त खासदार असलेल्या पक्षाच्या विरुद्ध लढलेल्या निवडणुकीचा निकाल काय असू शकतो हे मला माहित आहे. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत मी उमेदवार होणार नाही असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.