सुशांतची आत्महत्या नसून हत्याच – रामदास आठवलेंचा खळबळजनक दावा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन |बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह याच्या निधनाला 2 महिने होऊन गेले. ही आत्महत्या आहे की हत्या आहे याचा तपास सध्या सीबीआय करत असून रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. आता केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सुशांतच्या वडिलांची व बहिणीची भेट घेतली. या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना आठवले म्हणाले,”सुशांतचा मृत्यू ही आत्महत्या नसून, हत्या आहे, आणि त्यावर माझा विश्वास आहे,” असं वक्तव्य त्यांनी केलं.

सुशांत सिंह राजपूतनं १४ जून रोजी मुंबईतील वांद्रे परिसरात असलेल्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. सध्या या प्रकरणात रिया चक्रवर्ती, महेश भट्ट, श्रुती मोदी यांच्या वर गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत. या प्रकरणाचा तपास सीबीआयसह ईडीही करत आहे.

आत्महत्या प्रकरणावरून वातावरण तापलेलं असतानाच केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी सुशांतचे वडील के.के. सिंह व बहीण राणी सिंह यांची फरिदाबाद येथे भेट घेतली. या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना रामदास आठवले यांनी सुशांतनं आत्महत्या केली नाही, त्याची हत्या करण्यात आल्याचा दावा केला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’