दहावीच्या परीक्षेत कॉपी करू देण्यासाठी मागितले 30 हजार रुपये; संस्थाचालकास अटक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – शिक्षणतज्ञ, संस्थाचालक एस.पी. जवळकर याने दहावीच्या विद्यार्थ्याला हॉलतिकीट आणि परीक्षेत मदत करण्यासाठी 30 हजार रुपये मागितले. विद्यार्थ्यांनी केलेल्या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लावलेल्या सापळ्यात एस.पी. जवळकर हे दहा हजार रुपयांची लाच घेताना शाळेतच रंगेहाथ पकडले गेले आहेत. यामुळे शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

एसीबीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार कलावती देवी चारीटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष संपत पाराजी जवळकर (64) यांच्या सातारा परिसरात पी डी जवळकर शाळेत तक्रार विद्यार्थी 17 नंबरचा फॉर्म भरून दहावीच्या परीक्षेला बसला होता. लिपिक सविता खामगावकर हिने हॉलतिकीटासह परीक्षेत मदत करण्यासाठी विद्यार्थ्याला 30 हजार रुपये लाचेची मागणी केली. तडजोडीअंती पंधरा हजार रुपये देण्याचे ठरले.

विद्यार्थ्याने एसीबीकडे तक्रार केली. दहा हजारांचा पहिला हप्ता घेताना जवळकर यांना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले. त्याच वेळी सविता खामगावकरलाही ताब्यात घेतले.

Leave a Comment