“स्वतःचे घोटाळे लपवण्यासाठी ईडीवर गंभीर आरोप”; मोहित कंबोज यांचा राऊतांवर हल्लाबोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । खासदार संजय राऊत यांच्याकडून ईडीवर आरोपांबाबत आज भाजपचे माजी पदाधिकारी मोहित कंबोज यांनी पत्रकार घेतली. यावेळी त्यांनी राउतावर निशाणा साधला. राऊत यांनी दिवसापूर्वी पत्रकार ईडीवर गंभीर आरोप केले होते. मग त्यांनी केलेल्या आरोपात पुरावे हे सीबीआयला का दिले नाहीत? राऊतांच्या आरोपाची सीआय चौकशी करण्यात यावी. वास्तविक स्वताचे घोटाळे लपवण्यासाठी राऊतांकडून ईडीवर गंभीर आरोप केले आहेत,” अशा टीका कंबोज यांनी केली.

मोहित कंबोज यांनी आज पत्रकार परिषद घेत संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. यावेळी ते म्हणाले की, संजय राऊत यांनी नुकतीच एक पत्रकार परिषद घेत केंद्रीय तपास यंत्रणेवर आरोप केले. शिवसेना भवनमध्ये बसून राऊतांनी जे आरोप केले त्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही सहमती दिली. त्यामुळे मुख्यमंत्र्यानीही आता सीबीआयला राऊतांनी पत्रातून केलेल्या आरोपाचा चौकशी करावी, अशी मागणी करावी.

राऊतांनी पत्रकार परिषद घेत जे आरोप केले आहेत. त्या व्यक्तींचा ईडीशी काहीच संबंध नाही. काही मोठ्या व्यक्तींवर राऊतांनी जे आरोप केले आहेत. राऊतांकडून करण्यात आलेले अनेक घोटाळे लपवण्यासाठी ईडीवर आरोप केले जात आहेत, अशी टीकाही यावेळी कंबोज यांनी केली.

Leave a Comment