औरंगाबाद – रेल्वे मंत्रालयाच्या दृष्टीने प्रवाशांच्या सोयीसुविधा अत्यंत महत्त्वाच्या आहेत. कुठल्याही प्रवाशांची गैरसोय होणार नाही याची काळजी आम्ही घेत राहू. एनसीआरच्या अधिकार क्षेत्रावर महाराष्ट्रासाठी 4 हजार 264 कोटी मंजूर करण्यात आले आहे. या कामांमध्ये 263 किलोमीटर दूसरी लाईन, 42 की.मी. तिसरी लाइन आणि 930 किलोमीटर समावेश आहे. तसेच 81 किलोमीटर लांबीच्या मुदखेड परभणी दरम्यानच्या रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण पूर्ण झाले आहे, अशी माहिती केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी बुधवारी रेल्वे बैठकीत दिली.
यावेळी बोलताना दानवे म्हणाले, 40 किलोमीटर अंतरासाठी अकोला अकोट दरम्यान गेज रूपांतर कार्य देखील पूर्ण झाले आहे. 34 आरकेएम अंतरासाठी अकोला लोहगड दरम्यान विद्युतीकरणाची कामे पूर्ण झाली आहेत. नाशिक आणि पुणे दरम्यान कनेक्टिव्हिटी ची प्रचंड मागणी आहे आणि या प्रकल्पाला प्राधान्य दिले जात आहे असेही त्यांनी सांगितले.
औरंगाबाद येथील शिवाजीनगर रेल्वे गेटवर कॉस्ट शेअरिंग तत्त्वावर भुयारी मार्ग केला जाईल. बीड परळी दरम्यान 30 किलोमीटर अंतरासाठी नवीन रेल्वे लाइनचे काम पूर्ण झाले आहे आणि चालू आर्थिक वर्षात 30 किलोमिटरचा आणखी एक भाग पूर्ण होण्याची शक्यता आहे असे यावेळी दानवे म्हणाले.