फाळणी एकदा झाली, आता पुन्हा होणार नाही; मोहन भागवत यांचे मोठे विधान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नोएडामध्ये कृष्णानंद सागर लिखित ‘विभाजनकालीन भारत के साक्षी’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी “फाळणीच्यावेळी भारत देशाला जे भोगावे लागले ते विसरता येणार नाही. भारताची विचारधारा हि सर्वांना सोबत घेऊन चालणारी आहे. फाळणी एकदाच झाली, आता पुन्हा होणार नाही, असे मोठे विधान भागवत यांनी केले.

यावेळी मोहन भागवत म्हणाले की, आपल्या भारत देशात हिंदू समाज बांधवांनी जगासाठी काहीतरी चांगली कामे करण्यासाठी सक्षम होणे आवश्यक आहे. आपण आपला इतिहास वाचायला हवा आणि खरे असलेले सत्य स्वीकारले पाहिजे. हिंदू समाजाने जगासाठी काहीतरी चांगले करण्यासाठी सक्षम व्हायला हवे.

भारताने फाळणीच्या काळात जे सोसले आहे, ते विसरता येणार नाही. ते केवळ तेव्हाच विसरता येईल जेव्हा पुन्हा सगळ्या गोष्टी पूर्वीसारख्या होऊन फाळणी रद्द होईल. इस्लामिक आक्रमकांची मात्र विचारसरणी अशीच होती की फक्त आपणच बरोबर बाकी सगळे चूक. ब्रिटीशांची विचारसरणीही तशीच होती. इतिहासात घडलेल्या वादाचे आणि लढाईचे मूळ हेच आल्याचे भागवत यांनी यावेळी सांगितले.

Leave a Comment