हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारा संविधानातील अनुच्छेद ३७० रद्द करण्यात आले. त्यानंतर येथील प्रश्न सुटतील असे वाटले होते. मात्र, ते सुटले नसल्याने याबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी महत्वाचे विधान केले आहे. “काश्मीरचा प्रश्न पूर्णपणे सुटलेला असल्याचे म्हंटले जात आहे. मात्र, जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारा संविधानातील अनुच्छेद ३७० रद्द करुनही तेथील प्रश्न पूर्णपणे सुटलेला नाही,” असे भगवंत यांनी म्हंटले आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी नागपुरात एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमास उपस्थिती लावली होती. यावेळी ते म्हणाले की, अनुच्छेद ३७० रद्द करण्यापूर्वी जम्मू काश्मीरसाठी दिला जाणारा ८० टक्के निधी राजकारण्यांच्या खिशात जात होता. आता अनुच्छेद रद्द केल्यानंतर काश्मीर खोऱ्यात विकास होताना आणि इतर फायदे मिळताना दिसत आहेत”.
गेल्या काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने जम्मू काश्मीरला गेलो होतो. त्या ठिकाणी जाऊन तेथील सध्याची परिस्थिती पाहिली. अनुच्छेद ३७० च्या नावाखाली भेदभाव सुरु होता. आता मात्र त्यासाठी जागा राहिलेली नाही”. ऑगस्ट २०१९ ला मोदी सरकारने जम्मू काश्मीरमधील नागरिकांना विशेष हक्क देणारे अनुच्छेद ३७० रद्द केले होते, असेही भगवंत यांनी यावेळी म्हंटले आहे.