हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाकाळानंतर, LIC च्या लाईफ इन्शुरन्स पॉलिसीच्या सरेंडर दरात वाढ झाली आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार, 2020-21 मध्ये, पॉलिसीच्या सरेंडरचा दर आधीच्या तुलनेत दुप्पट झाला आहे. जर आपल्यालाही पॉलिसी सरेंडर करायची असेल तर त्याआधी नियम समजून घ्या.
हे लक्षात घ्या कि, LIC पॉलिसी मध्येच बंद करण्याला पॉलिसी सरेंडर करणे असे म्हंटले जाते. नियमांनुसार कमीत कमी 3 वर्षानंतरच LIC पॉलिसी सरेंडर करता येते. मात्र जर 3 वर्षांआधीच तो सरेंडर केली तर पैसे मिळणार नाहीत.
सरेंडर व्हॅल्यू
पॉलिसी सरेंडर केल्यानंतर LIC च्या नियमांनुसार सरेंडर व्हॅल्यू दिली जाते. याचा अर्थ, जर आपण पॉलिसी बंद करण्याचा निर्णय घेतला तर आपल्याला त्याच्या मूल्याच्या बरोबरीची रक्कम परत दिली जाते ज्याला सरेंडर व्हॅल्यू असे म्हणतात. जर आपण संपूर्ण तीन वर्षांसाठी एलआयसीचा प्रीमियम भरला असेल, तरच सरेंडर व्हॅल्यू मिळू शकेल.
किती पैसे परत मिळतील ???
हे लक्षात घ्या कि, पॉलिसी सरेंडर केल्याने खूप नुकसान होते. जर आपण सलग 3 वर्षे प्रीमियम भरला असेल तर आपण सरेंडर व्हॅल्यूसाठी पात्र असाल. त्यानंतर, आपल्याला भरलेल्या प्रीमियमच्या फक्त 30 टक्केच मिळतील मात्र पहिल्या वर्षाचा प्रीमियम वगळून. म्हणजे पहिल्या वर्षी भरलेल्या प्रीमियमचे पैसे देखील शून्य होतात. अशा प्रकारे, उर्वरित दोन वर्षांसाठी 30 टक्के उपलब्ध होतील. यात रायडर्ससाठी भरलेला कोणताही अतिरिक्त प्रीमियम, टॅक्स आणि LIC कडून मिळालेल्या कोणत्याही बोनसचा समावेश नाही.
पॉलिसी सरेंडर करण्यासाठी एलआयसी सरेंडर फॉर्म आणि NEFT फॉर्म गरजेचं आहे. या फॉर्म्ससोबत आपल्याला पॅन कार्डची आणि मूळ पॉलिसी कागदपत्रांची कॉपी जोडावी लागेल. यानंतर हाताने लिहिलेल्या पत्रासोबत पॉलिसी का बंद करत आहोत हे स्पष्ट करावे लागेल.
या कागदपत्रांची गरज भासेल
1. मूळ पॉलिसी बाँड डॉक्युमेंट्स
2. LIC पॉलिसी सरेंडर फॉर्म क्रमांक 5074. (फॉर्म डाउनलोड केला जाऊ शकतो).
3. बँक खात्याचे तपशील
4. एलआयसीचा NEFT फॉर्म (जर तुम्ही सरेंडर फॉर्म वापरत नसाल).
5. मूळ ओळखपत्र जसे की आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा पॅन कार्ड.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://licindia.in/
हे पण वाचा :
HOP OXO Electric Bike : 150 किमी रेंज असलेली इलेक्ट्रिक बाईक लॉन्च; पहा किंमत आणि वैशिष्ट्ये
‘या’ Multibagger Stock ने दीर्घकालवधीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना दिला मोठा रिटर्न !!!
‘या’ Multibagger Stock ने दीर्घकालावधीमध्ये गुंतवणूकदारांना केले मालामाल !!!
Chinese Loan App प्रकरणी ED कडून पेटीएम, रेझरपेच्या कार्यालयांवर छापे
SBI देत आहे अल्पवयीन मुलांसाठी खाते उघडण्याची सुविधा, त्याचे फायदे काय आहेत ते पहा