महिलेच्या गळ्यातील सोने चोरणे पडले महागात, गावकऱ्यांनी दिली ‘हि’ भयंकर शिक्षा

crime
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली : हॅलो महाराष्ट्र – सांगली जिल्ह्यातील मिरज या ठिकाणी एका चोराला जमावाने बेदम मारहाण केली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. संबंधित चोरट्याने एका महिलेच्या गळ्यातील सोने हिसकावण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर तो पळून जात असताना गावातील लोकांनी पाठलाग करत त्याला पकडले. यानंतर गावातील संतप्त जमावाने चोरट्याचे हात बांधून त्याला काठीनं अन् लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली आहे.

हि घटना सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्याच्या एरंडोली-गुंडेवाडी रस्त्यावरील आहे. हा आरोपी रस्त्यावरून पायी प्रवास करणाऱ्या महिलांचे सोने हिसकावून पळ काढत होता. यावेळी ग्रामस्थानी चोरट्याचा पाठलाग करून त्याला बेदम चोप दिला आहे. यापूर्वीदेखील या रस्त्यावर अनेक चोऱ्या झाल्या आहेत. त्यामुळे दहशतीखाली वावरणाऱ्या लोकांनी संबंधित चोराला टार्गेट बनवले आहे.

या चोरट्याचे नाव आकाश मारुती हाराळे असे आहे. तो मुळचा कर्नाटक राज्यातील रहिवासी असल्याचे समजत आहे. ग्रामस्थांनी चोरट्याला पकडल्यानंतर त्याला मारहाण केली. ग्रामस्थांनी त्याला काठीने आणि लाथा बुक्क्यांनी पाठीवर आणि मानेवर बेदम मारहाण केली आहे. हा आरोपी जीवाच्या आकांताने माफी मागत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे.