हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Netflix : सध्याच्या काळात OTT प्लॅटफॉर्म खूपच लोकप्रिय झाले आहे. याद्वारे लोकांना मनोरंजनाचे एक चांगले साधन उपलब्ध झाले आहे. यापैकीच Netflix हे सर्वात जास्त लोकप्रिय OTT प्लॅटफॉर्म ठरले आहे. याद्वारे चित्रपट आणि वेबसिरीज सहीत भरपूर कन्टेन्ट उपलब्ध झाला आहे. मात्र, ते पाहण्यासाठी त्याचे सबस्क्रिप्शन विकत घ्यावे लागते. त्याचे प्लॅन्स खूप महाग असल्याने ते प्रत्येकालाच परवडेल असे नाही. मात्र आता ग्राहकांसाठी चांगली संधी आहे. कारण Airtel आणि Jio सारख्या टेलिकॉम ऑपरेटरकडून काही रिचार्ज प्लॅनमध्ये डेटा आणि कॉलिंग व्यतिरिक्त, फ्री Netflix सारखे OTT चे बेनिफिट्स देखील देण्यात येत आहेत. चला तर मग आज आपण फ्री नेटफ्लिक्स सबस्क्रिप्शन देणाऱ्या काही प्लॅन्स बाबतची माहिती जाणून घेउयात…
Airtel चा 1199 रुपयांचा पोस्टपेड प्लॅन
Airtel च्या या प्लॅनमध्ये कंपनीकडून ग्राहकांना 150GB डेटा, डेली 100SMS आणि अनलिमिटेड कॉलिंग दिले जात आहे. यासोबतच Netflix, एमेझॉन प्राइम व्हिडिओ आणि डिस्ने प्लस हॉटस्टारचे फ्री सबस्क्रिप्शनही उपलब्ध आहे.
Airtel चा 1499 रुपयांचा पोस्टपेड प्लॅन
Airtel च्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना एकूण 200GB डेटा, डेली 100SMS आणि अनलिमिटेड कॉलिंग दिले जाते. यासोबतच ग्राहकांना Netflix, एमेझॉन प्राइम व्हिडिओ आणि डिस्ने प्लस हॉटस्टारचे फ्री सबस्क्रिप्शनही मिळते.
Jio चा 399 रुपयांचा पोस्टपेड प्लॅन
जिओच्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना एकूण 75GB डेटा दिला जाईल. तसेच यानंतरच्या प्रत्येक GB साठी 10 रुपये शुल्क आकारले जाईल. यासोबतच अनलिमिटेड कॉलिंग, फ्री Netflix मोबाइल प्लॅन आणि फ्री एमेझॉन प्राइम सब्सक्रिप्शनही देण्यात आले आहे.
Jio चा 599 रुपयांचा पोस्टपेड प्लॅन
या प्लॅनमध्ये ग्राहकांना एकूण 100GB डेटा दिला जाईल. यासोबतच फॅमिली प्लॅन अंतर्गत अनलिमिटेड कॉलिंग, डेली 100 एसएमएस आणि जिओचे एक अतिरिक्त सिम कार्ड दिले जाईल. यामध्ये फ्री नेटफ्लिक्स आणि फ्री एमेझॉन प्राइम सब्सक्रिप्शन देखील देण्यात आले आहे.
Jio चा 799 रुपयांचा पोस्टपेड प्लॅन
या प्लॅनमध्ये ग्राहकांना एकूण 150GB डेटा, डेली 100 एसएमएस, अनलिमिटेड कॉलिंग आणि दोन अतिरिक्त सिम कार्ड दिले जातील. यासोबतच Netflix, एमेझॉन प्राइम आणि जिओ एप्सवर फ्री एक्सेसही मिळेल.
Jio चा 999 रुपयांचा पोस्टपेड प्लॅन
या प्लॅनमध्ये ग्राहकांना एकूण 200GB डेटा, डेली 100 एसएमएस, अनलिमिटेड कॉलिंग आणि तीन अतिरिक्त सिम कार्ड दिले जातील. यासोबतच Netflix, एमेझॉन प्राइम आणि जिओ एप्सवर फ्री एक्सेसही मिळेल.
Jio चा 499 रुपयांचा पोस्टपेड प्लॅन
या प्लॅनमध्ये ग्राहकांना एकूण 300GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग, डेली 100SMS आणि Netflix आणि Amazon Prime चे फ्री सबस्क्रिप्शन दिले जाईल. यासोबतच निवडक शहरांमध्ये इंटरनॅशनल रोमिंगची सुविधाही देण्यात आली आहे.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.jio.com/
हे पण वाचा :
बंद झालेली LIC पॉलिसी पुन्हा सुरू करण्या संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या
Bank Account : आपले बंद झालेले खाते पुन्हा सुरु करण्यासाठीचे नियम तपासा
SBI कडून ग्राहकांना धक्का !!! बँकेने कर्जावरील व्याजदरात केली वाढ
मोबाईल कंपन्या Charger मध्ये जाणूनबुजून छोटी वायर का देतात??? जाणून घ्या यामागील कारण
FD Rates : ‘या’ सरकारी बँकेच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी !!! बँकेने FD वरील व्याजदरात केली वाढ