हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – 1980 च्या दशकात आशियातील सर्वात वेगवान धावपटू अशी ख्याती मिळवणाऱ्या लिडीया डी वेगा (Runner Lydia de Vega) यांचे आज कर्करोगाच्या आजाराने निधन झाले आहे. त्या 57 वर्षांच्या होत्या. 1980 च्या दशकातील धावण्याच्या शर्यतींवर लिडीया (Runner Lydia de Vega) यांची जणू मक्तेदारी होती. त्यांनी (Runner Lydia de Vega) आपल्या कारकीर्दीत 15 सुवर्णपदक जिंकले आहेत.
लिडीया (Runner Lydia de Vega) यांनी 1987 मध्ये 100 मीटर शर्यत जिंकताना 11.28 सेकंद अशी सर्वोत्तम वेळ दिली होती. 1982 च्या नवी दिल्ली आणि 1986 च्या सेऊल अशा दोन आशियाई क्रीडा स्पर्धामध्ये तिने 100 मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकले होते. त्यावेळी भारताच्या दिग्गज धावपटू पी. टी. उषा आणि लिडीया यांच्यात पदकांसाठी कायम चुरस होत होती.
1980च्या दशकात पी. टी. उषा पूर्ण भरात होती. या कालावधीत 200, 400 मीटर धावण्याची आणि 400 मीटर अडथळा शर्यतीत उषाची बरोबरी करणे कोणालाही शक्य नव्हते. मात्र, 100 मीटर शर्यतीत लिडीया डी वेगाने (Runner Lydia de Vega) प्रत्येकवेळी पी. टी. उषाला मागे टाकले आहे.
हे पण वाचा :
DJ च्या गाडीवर अचानक पसरला करंट; नाचता नाचता तरुणांची झाली भयंकर अवस्था
पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर मोठा अपघात; शिवशाही बस पलटी होऊन खड्ड्यात
Jasprit Bumrah आशिया चषक स्पर्धेला मुकणार ? समोर आलं ‘हे’ मोठं कारण
सपाच्या जिल्हा अध्यक्षांच्या गाडीला अपघात थोडक्यात बचावले, थरारक Video आला समोर
भाजप प्रदेशाध्यक्षपदी आशिष शेलारांच्या नावाची चर्चा?? तर चंद्रकांत पाटलांना…