हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व पदांचा राजीनामा दिल्यानंतर त्याची अधिकृत घोषणा काल रूपाली पाटील-ठोंबरे यांनी केली. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्थिरावणार असल्याचे सांगितले. दरम्यान त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुणे महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली पाटील-ठोंबरे यांनी पक्षाच्या सर्व पदांचा तसंच प्राथमिक सदस्यत्वाचाही राजीनामा दिला होता. त्यांनी आज सकाळी ट्विट करीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. त्यानुसार त्यांनी दुपारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
काल झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी मी संघर्ष करणारी कार्यकर्ती आहे, पक्षासाठी तुरुंगवासही भोगला आहे. माझी खदखद मी राज ठाकरेंपर्यंत पोहोचवली आहे. बदल घडत नसेल तर मला बदल करावा लागेल. मला विविध पक्षांकडून ऑफर आल्या आहेत परंतु मी निर्णय घेतला नाही”, असे सांगितले होते.