रशियाने Google ला ठोठावला 3,000 कोटींचा दंड !!!

Google
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । युक्रेनशी सुरू युद्धादरम्यान मॉस्को न्यायालयाकडून Google ला रशियाविरुद्ध बेकायदेशीर आणि दिशाभूल करणाऱ्या बातम्या चालवल्याबद्दल आणि युक्रेन युद्धाविषयी खोटी माहिती दिल्याबाबत दोषी ठरवण्यात आले आहे. ज्यासाठी त्यांना 3,000 कोटी रुपयांचा दंड ठोठावला गेला आहे.

Russia fines Google £73m over failure to delete 'illegal' content | Russia  | The Guardian

सरकारकडून वारंवार इशारा देऊनही यूट्यूब आणि इतर ठिकाणांहून असा मजकूर हटवला गेलेला नाही. ज्यामुळे गुगलला 21.1 अब्ज रूबल (सुमारे 3,000 कोटी रुपये) दंड ठोठावण्यात आला. याप्रकरणी येथील नियामक असलेले Roskmenzor ने सांगितले की,” Tansky न्यायालयाने Google ला 37.3 कोटी डॉलर्सचा दंड ठोठावला आहे. कारण वारंवार विनंती करूनही कंपनीने आपल्या साइटवरून हे प्रतिबंधित मटेरियल हटवले नाहीत. याबाबत न्यायालयाने विशेषतः यूट्यूबला स्पष्ट ताकीद दिली आहे.

Russia fines Google over content, bigger penalty looms | Reuters

गुगलचे बँक अकाउंट देखील बंद केले गेले

न्यायालयाने रशियामधील एकूण वार्षिक उलाढालीनुसार Google वरील दंडाची रक्कम निश्चित केली आहे. गेल्या वर्षी देखील कंपनीला 7.2 अब्ज रूबलचा दंड ठोठावण्यात आला होता. गुगलचे रशियातील बँक अकाउंटही यावेळी फ्रीझ करण्यात आले आहे. यासोबतच कंपनीविरोधात दिवाळखोरीची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. अशा स्थितीत कंपनीला येथील कर्मचाऱ्यांना पगार देणे अवघड झाले आहे.

Russia fines Google for not deleting banned content | Arab News

कंपनीला अनेक वेळा इशारे देण्यात आले

मॉस्कोकडून Google ला अनेक वेळा अशा प्रकारचे कन्टेन्ट त्यांची साइट आणि YouTube वरून काढून टाका आणि पुन्हा प्ले करू नका असा इशारा दिला होता, मात्र युक्रेन युद्धादरम्यान, कंपनीने जास्तच प्रक्षोभक आणि चुकीची माहिती प्रसारित केली. गुगलची मूळ कंपनी असलेल्या अल्फाबेट यूट्यूबला रशियाने दीर्घकाळा पासून टार्गेट केले आहे. Roskmenjor म्हणाले,”यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे गुगल आमच्या विरोधात चुकीचा प्रचार करत आहे.”

Russia Fines Google $98 Million in Crackdown | Time

एका ताज्या प्रकरणात न्यायालयाला असे आढळून आले कि, युट्युब हे रशियातील तरुणांना बेकायदेशीर निषेधासाठी भडकवते. यासाठी कंपनी ऑनलाइन सर्वेद्वारे लोकांना सरकारच्या विरोधात भडकवते. तसेच मुलांची दिशाभूल करण्यासाठी प्रतिबंधित व्हिडिओ कन्टेन्ट वापरते.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : http://www.google.com

हे पण वाचा :

Post Office ‘या’ बचत योजनेत गुंतवणूक करून मिळवा 15 लाख रुपये !!!

Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, आजचे दर पहा

Card Payment : ATM, डेबिट आणि क्रेडिट कार्डमध्ये काय फरक आहे ते समजून घ्या

DBS Bank ने ​​FD वरील व्याजदरात केली वाढ, असे असतील नवीन व्याजदर

SIP मध्ये होणारे नुकसान अशा प्रकारे टाळा !!!