राजस्थानमधील राजकीय पेच अजूनही कायम; सचिन पायलट नेतृत्व बदलावर ठाम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जयपूर । राजस्थानमध्ये राजकीय पेच अजूनही कायम आहे. राजस्थानचे उपमुख्यमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट राज्यात नेतृत्व बदलाच्या मुद्द्यावर ठाम असल्याचं बोललं जात आहे. तर मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी सत्तेवर कायम राहण्यासाठी पूर्ण जोर लावला आहे. त्यामुळे आता पक्ष काय निर्णय घेतो किंवा पायलट यांची कशी समजूत काढतो हे पाहावं लागणार आहे. पायलट यांचे समर्थक दावा करत आहेत की, त्यांच्याकडे ३० आमदारांचं समर्थन आहे. मंगळवारी सकाळी १० वाजता पुन्हा काँग्रेसची बैठक होणार आहे. पण सचिन पायलट या बैठकीत ही जाणार नसल्याचं समोर येतं आहे. सचिन पायलट यांच्या सोबतच्या इतर बंडखोर आमदारांना देखील बैठकीसाठी बोलवण्यात आलं आहे.

काँग्रेसचे नेते रणदीप सुरजेवाला यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले की, पक्षाचे दरवाजे खुले आहेत. पण या आवाहनानंतर प्रश्न असा उभा राहतो की, जर सचिन पायलट यांनी पक्ष सोडलाच नाही तर मग ते दरवाजे खुले ठेवण्याचा प्रश्न कुठे येतो? यावर सचिन पायलट माध्यमांशी बोलताना म्हणाले की, काँग्रेसशी चर्चा निराधार आहे. आम्ही काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याशी बोललो नाही. आम्ही कोणत्याही काँग्रेस नेत्याच्या संपर्कात नाही. ही आता आमच्या स्वाभिमानाचा लढा आहे. पायलट यांच्या या विधानावरून हे स्पष्ट झाले आहे की ते माघार घेणार नाहीत असे संकेत दिले. दरम्यान, सोमवारी दुपारी अशोक गहलोत यांनी 109 आमदारांसह मीडिया परेड केली. परंतु पायलट गटाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर पुन्हा त्यांच्या सरकारवर संकटाचं ढग असल्याचं दिसून आलं. 109 आमदारांची उपस्थिती असली तर देखील गेम काही वेगळा होऊ शकतो.

अशा स्थितीत काँग्रेसकडेही पर्याय उरलेला नाही. राज्यात कॉग्रेसमध्ये दोन गट वेगळे झाले आहेत. विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत पायलट समर्थकांबाबतही निर्णय घेण्यात येऊ शकतो. पायलट यांच्या रणनीतीमुळे जर काँग्रेसचं सरकार पडलं तर मग कोण सरकार स्थापन करणार? असा प्रश्न उपस्थित होतो. भाजपने जर सरकार स्थापन करण्यासाठी हालचाली केल्या. तर पायलट यांना भाजप मुख्यमंत्री करणार का? तर मग वसुंधरा राजे यांच्याबाबत पक्ष काय निर्णय घेणार असे अनेक प्रश्न अजूनही गुलदस्त्यात आहेत. गहलोत सरकारवरील संकट अजूनही कायम आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

Leave a Comment