मुंबई । आपल्या कसदार अभिनय कौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडणारा अभिनेता इरफान खानचे बुधवारी निधन झाले. मंगळवारी कोलन इन्फेक्शनमुळे त्यांना इस्पितळात भरती करण्यात आलं होतं. यादरम्यान त्यांच्या आरोग्याविषयीच्या अनेक अफवा पसरत होत्या. मात्र इरफान यांच्या टीमने ते लढवय्ये असून लवकर बरे होतील अशी आशा व्यक्त केली होती. मात्र रुपेरी पडद्यावरून असंख्य प्रेक्षकांच्या मनात घर करणाऱ्या या कलाकारानं आज जगातून कायमची एक्झिट घेतली. इरफान खानच्या अकाली जगातून निघून जाण्यानं त्याच्या चाहत्यांवर शोककळा पसरली आहे. या चाहत्यांमध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, बिग बी अमिताभ बच्चन, आणि गान सम्राग्नि लता मंगेशकर यांनी तीव्र शोक व्यक्त केला. ट्विटरच्या माध्यमातून या सर्वानी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
सचिन आपल्या ट्विटमध्ये म्हणाला कि, ”इरफान खान यांचे निधन झाल्याची बातमी ऐकून वाईट वाटले. तो माझ्या सर्वात आवडत्या अभिनेत्यानंपैकी एक होता आणि मी त्याचे जवळजवळ सर्व चित्रपट पाहिले आहेत, त्याचा शेवटचा चित्रपट अंग्रेजी मिडीयम सुद्धा मी पाहिला. तो फारच सहजपणे अभिनय करायचा, तो अफलातून होता. त्याच्या आत्म्याला शांती लाभो! त्याच्या प्रिय व्यक्तीबद्दल संवेदना!”
Sad to hear the news of #IrrfanKhan passing away. He was one of my favorites & I’ve watched almost all his films, the last one being Angrezi Medium. Acting came so effortlessly to him, he was just terrific.
May his soul Rest In Peace. ????????
Condolences to his loved ones. ☹️ pic.twitter.com/gaLHCTSbUh— Sachin Tendulkar (@sachin_rt) April 29, 2020
बॉलीवूडचे शहंशाह बिग बी अमिताभ बच्चन यांनी इरफानच्या निधनावर संवेदना व्यक्त केल्या. आपल्या ट्विटमध्ये अमिताभ बच्चन म्हणतात कि,” ”नुकतीच इरफान खानच्या निधनाची बातमी ऐकली, ही सर्वात त्रासदायक आणि दुखद बातमी आहे. एक अविश्वसनीय प्रतिभा असलेला, एक कृपाळू सहकारी, जागतिक सिनेमात एक महत्त्वपूर्ण योगदान देणारा हा कलाकार आम्हाला लवकर सोडून गेला. त्याच्या जाण्याने एक प्रचंड मोठी पोकळी तयार झाली आहे.”
T 3516 – .. just getting news of the passing of Irfaan Khan .. this is a most disturbing and sad news .. ????
An incredible talent .. a gracious colleague .. a prolific contributor to the World of Cinema .. left us too soon .. creating a huge vacuum ..
Prayers and duas ????— Amitabh Bachchan (@SrBachchan) April 29, 2020
गान कोकिळा लता मंगेशकर यांनी सुद्धा इरफानच्या जाण्यावर तीव्र शोक व्यक्त केला. त्यानी ट्विट करत म्हटलं कि,” गुणी अभिनेता इरफान खान यांच्या निधनाची बातमी ऐकून मला खूप दुःख झालं आहे. मी त्यांना विनम्र शब्दांजली अर्पण करते.”
Bahut guni abhineta Irrfan Khan ji ke nidhan ki khabar sunkar mujhe bahut dukh hua. Main unko vinamra shraddhanjali arpan karti hun.
— Lata Mangeshkar (@mangeshkarlata) April 29, 2020
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”