आता मास्क काढलाय, तुमचा चेहरा काय चंद्राचा मुखडा होता काय?; सदाभाऊंची मुख्यमंत्र्यांवर टीका

Sadabhau Khot Uddhav Thackeray
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या महाविकास आघाडी सरकारवर भाजप व भाजपमधील नेत्यांकडून निशाणा साधला जात आहे. दरम्यान रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. “दोन वर्षानंतर तुम्ही मास्क काढून बोलत आहात. त्याच्या बातम्याही आल्या. तुमचा चेहरा काय चंद्राचा मुखडा होता काय? 13 कोटी जनता हे सहन करणार नाही, अशी टीका मुख्यमंत्र्यांवर केली आहार तर “मी शरद पवारांना शेतकऱ्यांचे जाणते राजे मुळीच म्हणणार नाही. ते खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचा प्रपंच मातीत घालणारे लुटारू राजे आहेत, असे म्हणत सदाभाऊंनी पवारांवर निशाणा साधला आहे.

टेंभुर्णी येथे जागर शेतकऱ्यांचा आक्रोश महाराष्ट्राचा अभियानाचा सांगता समारोपाची सभा पार पडली. यानंतर सदाभाऊ खोत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी खोत म्हणाले लि, राज्याचे सर्वात जास्त वाटोळे कुणी केले असेल तर ते बारामतीकरांनी केले आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी उभ्या केलेल्या सहकार चळवळीचे श्राद्ध घालण्याचे काम बारामतीकरांनी केले आहे, अशी घणाघाती टीकाही त्यांनी केली. नवाब मलिकांच्या जावयाकडे गांजा सापडला तर त्याला हर्बल तंबाखू म्हणता. एखाद्या शेतकऱ्याच्या शेतात खसखस पिकवली तर त्याला गांजा पिकवला म्हणून तुरुंगात टाकता. हा कुठला न्याय?

यावेळी सदाभाऊंनी शिवसेनेवरही निशाणा साधला. ते म्हणाले की, शिवसेना नेते नेहमी म्हणतात 13 कोटी जनतेचा अपमान झाला. अरे हे काय तुमचे प्रॉडक्ट आहे का ? सगळ्यांचा अपमान व्हायला. भाजपचे कोणीही आत गेले की एका ठिकाणी गुन्हा घडला कि त्यावर 12 ठिकाणी गुन्हे दाखल होतात. महाराष्ट्रातील पोलिसांना वेठबिगाऱ्यासारखे वापरु नका, असा सल्लाही खोत याणी दिला.

पवार तर शेतकऱ्यांना मातीत घालणारे लुटारू राजे

शेतकऱ्यांना मातीत घालणारे लुटणारी कोण असेल तर ते शरद पवार हे होय. ते जाणता राजा न्हवते तर ते लुटारू होते, अशी टीकाही यावेळी सदाभाऊ खोत यांनी केली आहे.

आमचीपण अवस्था केतकी चितळेसारखी

सदाभाऊ खोत यांनी टेंभुर्णी येथे अभिनेत्री केतकी चितळे हिच्या नावाचा नामोल्लेख करत विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना आवाहन केले होते. फडणवीस साहेब तुम्ही परत या, आमची केतकी चितळेसारखी अवस्था झाली आहे, असे सदाभाऊंनी म्हंटले आहे.