पवार कुटुंब आणि राष्ट्रवादीकडून माझ्या जीवाला धोका; सदाभाऊंचा गंभीर आरोप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सोलापूर दौऱ्यावर असताना हॉटेल च बिल मागून एका हॉटेल आल्याने रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांचा ताफा अडवला. या घटनेनंतर संतप्त झालेल्या सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस वर हल्लाबोल केला. पवार कुटुंब आणि राष्ट्रवादी काँग्रेस कडून माझ्या जीवाला धोका आहे असा गंभीर आरोप त्यांनी केला.

पत्रकार परिषद घेत सदाभाऊ म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पवार कुटुंबाकडून माझ्या जीवाला धोका आहे. ही माणसे कोणत्याही थराला जाऊ शकतात. पण माझं त्यांना सांगणे आहे की, माझा प्राण गेला तरी चालेल. पण तुमची ही व्यवस्था, मस्तवाल पणाने उभा राहिलेला चिरेबंदी वाडा पाडल्या शिवाय सदाभाऊ शांत बसणार नाही.

माझा आणि त्या हॉटेल वाल्याचा काहीही संबंध नाही अस सदाभाऊ खोत यांनी स्पष्ट केले. त्याच्यावर कोणाचा दबाव होता का?? असा सवाल करत या प्रकरणाची गंभीर दखल घेण्याची मागणी आपण गृहमंत्र्यांना करणार आहोत, तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचीही मदत घेणार आहोत अस सदाभाऊ खोत यांनी सांगितले.

Leave a Comment