पुतण्यापासून मला वाचवा अशी हाक महाराष्ट्रात ऐकू येतेय; सदाभाऊंचा पवारांवर निशाणा

sadabhau khot on sharad pawar (1)
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका करताना रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांची जीभ घसरली आहे. शरद पवार हे सैतान असून त्यांना त्यांची पापे फेडावीच लागणार आहेत. काका मला वाचवा असं आपण इतिहासात ऐकलं पण आता पुतण्यापासून मला वाचवा अशी हाक महाराष्ट्रात ऐकू येत आहे असं म्हणत त्यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

सदाभाऊ खोत म्हणाले, महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये यशवंतराव चव्हाण, सुधाकरराव नाईक, वसंतदादा पाटील या माणसांच मोठं योगदान आहे. ८०च्या दशकामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार साहेबांचा उदय झाला आणि तिथून पुढे राजकारणाचा ऱ्हास व्हायला सुरुवात झाली. राजकारणाचा इतका ऱ्हास झाला की वाडे विरुद्ध गावगाडे आणि प्रस्थापित विरुद्ध विस्थापित असा एक नवा सरंजमशाहीचा संघर्ष पवारांच्या कालखंडात उभा राहिला हे संपूर्ण महाराष्टने पाहिले आहे.

शरद पवारांनी सरदारांना सोबत घेऊन महाराष्ट्रावर राज्य केलं, त्या सरदारांनी शेतकऱ्यांची घरे लुटली, गावगाडा उध्वस्त केला. ते सरदार आज सैरभैर पळायला लागले आणि पवार साहेबांवर नियतीने मोठा सुड उगवला. त्यामुळे त्यांना गावगाड्याकडे धावतं यावं लागत आहेत. यापूर्वी पुण्यामध्ये काका मला वाचवा अशी हाक ऐकू आली होती आता मात्र पुतण्यापासून मला वाचवा अशी नवी हाक महाराष्ट्राला ऐकू येत आहे असा टोलाही सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांना लगावला. पूर्वीच्या काळी बापाने पाप केलं कि ते पोराला फेडावं लागत होत, पण या कलयुगात ज्याचे त्यालाच पाप फेडावं लागतंय अस म्हणत सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर जोरदार निशाणा साधला आहे.