रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम ED च्या ताब्यात; सोमय्यांची माहिती

0
585
sadanand kadam ED
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिंदे गटातील नेते रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम यांना ईडीने ताब्यात घेतलं आहे. दापोली येथील साई रिसॉर्ट प्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. ईडीने या वृत्ताला अजूनही दुजोरा दिला नाही. मात्र, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे . शिंदे गटाच्या नेत्याच्या भावावरच ईडीची कारवाई करण्यात आल्यांनतर राजकीय चर्चाना उधाण आलं आहे.

अनिल परब यांचे पार्टनर सदानंद कदम यांना अटक.. अब क्या होगा तेरा अनिल परब असं ट्विट किरीट सोमय्या यांनी केलं आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग केलं आहे. सदानंद कदम यांच्या अटकेमुळे अनिल परब यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

साई रिसॉर्टचं खरेदी विक्री प्रकरण संशयास्पद असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. नियमांचे उल्लंघन करून हे रिसॉर्ट बांधण्यात आलं आहे असं सोमय्या यांनी म्हंटल होत. सुरुवातीपासूनच त्यांनी या संपूर्ण प्रकरणात अनिल परब यांच्यावर वेगवेगळे आरोप करण्यात आले. अनिल परब यांनी सदानंद कदम यांच्या नावावर सर्व व्यवहार करून मालक म्हणून स्वत:ची ओळख लपवली होती असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. तसेच त्यांची चौकशीही करण्यात आली होती.