मविआच्या काळातच सॅफ्रन प्रकल्प हैद्राबादला गेला; फडणवीसांनी पुरावेच दिले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून राज्यातील एंक प्रकल्प इतर राज्यात गेल्यामुळे राज्यात राजकीय आरोप – प्रत्यारोप सुरु आहेत. त्यातच आता नागपूर येथे होणारा सॅफ्रन प्रकल्प हैद्राबादला गेल्यांनतर विरोधकांनाही शिंदे – फडणवीस सरकारवर टीका केली होती त्याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट पत्रकार परिषद घेत विरोधकांना प्रत्युत्तर दिले आहे. तसेच माविआच्या काळातच सॅफ्रन प्रकल्प हैद्राबादला गेला असा दावाही त्यांनी केला.

देवेंद्र फडणवीस आज काही कागदपत्रे घेऊनच पत्रकार परिषदेला आले. सॅफ्रनच्या बाबतीत तर विरोधकांनी कहरच झाला. माविआच्या काळातच सॅफ्रन प्रकल्प हैद्राबादला गेला. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे होते. मग जी फॅक्टरी 2021 मध्ये हैदराबादेत तयार झाली, तो प्रकल्प या आठवड्यात कसा जाऊ शकतो? फेक नरेटिव्हचा तर हा कहर झाला असं फडणवीस म्हणाले. मागच्या वर्षीच जो प्रकल्प गेला त्यावर हे लोक आत्ता आंदोलन करत आहेत असं म्हणत फडणवीस यांनी काही कागदपत्रही दाखवली.

काही नेते आणि HMV पत्रकार महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहेत. माझा प्रश्न आहे, ज्यांनी रिफायनरीला विरोध केला, त्यांना गुंतवणुकीवर बोलण्याचा काय अधिकार? महाराष्ट्रात आलेली गुंतवणूक तुमच्या कारभारामुळे महाराष्ट्राच्या बाहेर गेली. तुम्हाला महाराष्ट्राच्या गुंतवणुकीवर बोलण्याचा अधिकार काय? त्यावेळी हे HMV पत्रकार का बोलले नाहीत असा सवाल फडणवीसांनी केला.

फॉक्सकॉनही आमच्या काळात महाराष्ट्राबाहेर गेला नाही. उद्धव ठाकरेंच्या काळात त्या वेळचे उद्योगमंत्री सुभाष देसांईनी सांगितलं होतं की फॉक्सकॉन महाराष्ट्रात येणार नाही. त्यामुळे तुमच्या अपयशाचे खापर आमच्यावर फोडू नका. महाराष्ट्राची विसकटलेली घडी आम्ही जागेवर आणण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही पुन्हा एकदा महाराष्ट्राला नंबर 1 बनवू अशी ग्वाही फडणवीसांनी दिली.