पतीला खासदार बनवण्यासाठी ‘या’ खासदाराची पत्नी प्रचाराच्या मैदानात

Untitled design
Untitled design
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
 सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे  
विकासाचा वेग वाढवण्यासाठी सर्वानी संजयकाकांच्या पाठीशी उभे राहणे काळाची गरज आहे.त्यासाठी पूर्वीपेक्षा अधिक मताधिक्क्याने काकांना विजयी करा. असे आवाहन खासदार संजयकाकांच्या पत्नी ज्योतीताई संजयकाका पाटील यांनी केले. सांगलीत महायुतीचे उमेदवार संजयकाका पाटील यांच्या प्रचारार्थ अभयनगरमध्ये सौ मिनाक्षी माने यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित महिला मेळाव्यात उपस्थितांसमोर त्या बोलत होत्या.
 स्वागत व प्रास्ताविक करताना अतुल माने यांनी, २३ एप्रिल पर्यंत अनेकजण विविध मार्गानी तुमचा बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न करतील, परंतु तुम्ही सावध राहावा असे सांगितले.सौ.पाटील आपल्या भाषणात, ‘यावेळी आपल्याला २०१४ ची पुनरावृत्ती करायची आहे. काकांच्या माध्यमातून आपल्याला विकासाची गंगा वाहती ठेवायची असल्याचं आवाहन त्यांनी यावेळी केले.
या कार्यक्रमासाठी महापौर संगीत खोत, आमदार सुधीर गाडगीळ, शेखर इनामदार, दीपक शिंदे, संगीता जाधव, सविता हुजरे, दीपाली पाटील, भारती दिगडे, राजश्री तांबवेकर, रुपाली गावडे, जयश्री मोरे, स्मिता पवार, शिल्पा पाटील, पूनम सूर्यवंशी, सुनंदा पाटील, सीता पाटील यांच्यासह अन्य महिला मोठ्यासंख्येने उपस्थित होत्या.छाया हाके यांनी आभार मानले.
संबंधित बातम्या