हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | “अयोध्येत बाबरी मशीद ज्यावेळी रामभक्तांनी पाडली.त्यावेळी ती मशीद पाडणारे आमचेचं शिवसैनिक होते,असे अख्ख्या जगाला छातीठोकपणे सांगणारे हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे हे देशातील एकमेव नेते होते.त्यावेळी भाजपचे सगळेच मान्यवर नेते मूग गिळून गप्प बसले होते. तेव्हा आमच्या वाघाने ते प्रकरण अंगावर घेतले आणि तुम्हाला त्यातून वाचवले.आज तुम्ही त्याच राममंदिराच्या नावाने जर भ्रष्टाचार करत असाल तर तुम्हाला जाब आम्ही विचारायचा नाही का? पण बेधुंद सत्तेच्या माजोरर्ड्या आविर्भावात तुम्ही आमच्याच श्रद्धास्थानावर येऊन आम्हाला धमकवणार हे आम्ही कसे खपवून घेऊ. शिवसेना भवन हे आमचे श्रध्दास्थान आहे आणि तुम्ही इथं येऊन आंदोलन करताय. त्यादिवशी आमच्या शिवसैनिकांनी भाजपच्या अंधभक्तांना जो “शिवमहाप्रसाद” दिलाय. ते योग्यच केलं हे पाहून आज मी खास त्या शिवसैनिकांचा सत्कार करायला आलो आहे, अशी प्रतिक्रिया साक्री तालुका युवा सेना प्रमुख चेतन उर्फ बाळासाहेब देवरे यांनी दिली.
अयोध्येतील श्रीराम मंदिर बांधण्यासाठी भूसंपादनात पैशाचा अपहार झाल्याचा शिवसेनेने खोटा आणि बनावट आरोप केल्याचा दावा करत मुंबई भाजपने शिवसेना भवनावर फटकार मोर्चा आयोजित केला होता. शिवसेना भवनापासून ५ किमी अंतरावरच पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांना अडवलं आणि ताब्यात घेतलं त्यामुळे संभाव्य वाद टळला असं चित्र दिसत असतानाच दुसरीकडे मोठा गोंधळ उडाला. त्यावेळी काही शिवसैनिकांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना,कार्यकर्त्यांना जोरदार चोप दिल्याचा आरोप केला जातोय. काही शिवसैनिकांवर गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहेत.या शिवसैनिकांना राज्यभरातून प्रचंड पाठिंबा मिळत असल्याचे सध्या चित्र आहे.
बाळासाहेब देवरे पुढे म्हणाले की…
“शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त मी गेल्या सात वर्षांपासून शिवसेना भवनात येतोय.यंदा कोविडमुळे काही बंधनं आली आहेत.पण तरी देखील आधी मी शिवसेना भवणातील आई जगदंबेचं दर्शन घेतलं आणि मोर्चाजीवी भाजपच्या अंधभक्तांना शिवसेना स्टाईलने प्रत्युत्तर देणारे दादर विभागप्रमुख राकेश देशमुख,मुंबईच्या माजी महापौर श्रध्दाताई जाधव यांचा सत्कार केला.सोबतच त्यांच्यासोबत काही विषयांवर चर्चा देखील केली.
भाजपचे गल्ली – बोळातले छोटे – मोठे नेते देखील त्यांची लायकी आणि पातळी सोडत शिवसेनेविषयी काहीही बरळू लागले होते,यापुढे सेनेच्या नादी लागायला ते हजार वेळा विचार करतील आणि शिवसेना ही आजही बाळासाहेबांचा खळखट्ट्याकाचा विचार घेऊन चालणारी सेना आहे, असा एक संदेश गेला आहे,असेही देवरे पुढे म्हणाले.
दरम्यान, राज्यभरातून भाजपच्या अंधभक्तांना शिवसैनिकांनी दिलेल्या “शिवमहाप्रसादाचे” सामान्य लोकांकडून देखील कौतुक केले जाते आहे.तसेच भाजपच्या मुजोरी राजकारणाला देशभरातून सक्षम पर्याय फक्त शिवसेनाचं ठरू शकते अशी एक चर्चा समाजमाध्यमांत रंगली आहे.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा