Monday, March 20, 2023

‘राधे’ से पंगा पडा महंगा..! कारवाईनंतर KRK झाला सैराट; ट्विटरवर केली ट्विट्सची बरसात

- Advertisement -

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। भाईजान अर्थात अभिनेता सलमान खानला नडणे एका अभिनेत्याला चांगलेच महागात पडतेय असे दिसत आहे. केआरके अर्थात कमाल आर खान याने ‘राधे’वर अशी काही टीका केली आहे, की भाईजान जाम भडकला. मग काय? त्याने सरळ के आर के विरोधात मानहानीचा दावा ठोकला. या कारवाईमुळे बहुतेक केआरके चांगलाच पिसाळला आहे. कारण कारवाईच्या काही तासानंतर त्याने ट्विटरवर एका पाठोपाठ एक ट्विट्सचा पाऊस पाडला आहे.

- Advertisement -

सलमानने चित्रपटाच्या प्रतिमेबाबत काहीबाही बोलणाऱ्या केआरकेला धडा शिकवण्यासाठी थेट त्याच्यावर मानहानीचा दावाच ठोकला आहे. मुख्य म्हणजे हि कारवाई झाल्यावरही केआरके काही शांत बसेना झाला आहे. या कारवाईनंतर केआरकेने ट्विटरवर अनेक ट्विट केले आहेत. जे सध्या तुफान वायरल होताना दिसत आहेत. सलमानने मुंबईच्या सिव्हिल कोर्टात केआरके विरोधात हा दावा दाखल केला आहे. यासोबत लवकरात लवकर यावर सुनावणी व्हावी, अशी मागणीदेखील करण्यात आली आहे. केआरकेवर ‘राधे- युअर मोस्ट वॉन्टेड भाई’ या चित्रपटाची प्रतीमा मलीन केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

 

केआरकेने त्याच्या ट्विटर व युट्यूब हॅण्डलवर ‘राधे- युअर मोस्ट वॉन्टेड भाई’बाबत रिव्ह्यू दिला होता. राधेचा पहिला पार्ट पाहून माझ्या मेंदूचा पार भुगा झाला. दुसरा पार्ट पाहण्याची माझी हिंमत होत नाहीये. दुसरा पार्ट पाहिला तर मला वेड लागेल, असे म्हणत केआरकेने या रिव्ह्यू व्हिडीओमध्ये चक्क अश्रू ढाळले होते. आता त्याच्या या कर्तूतिचा पुरस्कार म्हणून सलमानने त्याच्यावर मानहानीचा दावा ठोकला आहे. पण सलमानच्या या कारवाईनंतर केआरकेने अनेक ट्विट करत त्याला आणखीच डिवचले आहे.

https://twitter.com/kamaalrkhan/status/1397343649277435907

प्रिय सलमान, हा मानहानीचा दावा तुझ्या नैराश्याचा पुरावा आहे. मी माझ्या फॉलोअर्ससाठी रिव्ह्यू देतोय आणि माझे काम करतो. मला रिव्ह्यू देण्यापासून रोखण्याऐवजी तुला चांगले सिनेमे बनवायला हवे. मी सत्यासाठी ही लढाई नक्की लढेन. केससाठी धन्यवाद,’ असे पहिले ट्विट केआरकेने केले. तर दुस-या ट्विटमध्ये त्याने लिहिले कि, ‘ सलमान खानने मी राधेचा रिव्ह्यू केल्यामुळे माझ्यावर मानहानीचा दावा ठोकला. याचा अर्थ स्पष्ट आहे, माझ्या रिव्ह्यूमुळे तो दुखावला आहे. यामुळे मी आता त्याच्या कोणत्याही सिनेमाचा रिव्ह्यू करणार नाही.’