Salman Khan | सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्यांना पोलिसांकडून अटक, चौकशीत धक्कादायक खुलासा

Salman Khan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | Salman Khan बॉलीवूड अभिनेता सलमान खान याच्या घराच्या बाहेर दोन दिवसापूर्वी अज्ञातांनी गोळीबार केला होता. आता या प्रकरणाबाबत एक सगळ्यात मोठी अपडेट समोर आलेली आहे. ज्या लोकांनी सलमान खानच्या घरावर गोळीबार केला, त्यातील दोन हल्लेखोर यांना मुंबई पोलिसांनी अटक केलेली आहे. गुजरातच्या भागातून या दोन आरोपीयांना अटक करण्यात आलेली आहे.

मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँच विभागांनी या दोन हाल्लेखोरांना अटक केलेले आहे. प्राथमिक स्वरूपात केलेल्या चौकशी दोघांनीही त्यांनी केलेल्या गुन्ह्याची कबुली दिलेली आहे. त्याचप्रमाणे या हल्लेखोरांचा लॉरेन्स बिश्नोई यांची संबंध असल्याचा देखील पोलिसांना संशय आलेला होता. त्यांच्याकडून मिळणाऱ्या काही रुपयांसाठी या हल्लेखोरांनी सलमान खानच्या घरावर गोळीबार केल्याचे देखील त्यांनी कबूल केलेले आहे. हा गोळीबार पहाटे झाला होता. गोळीबार करण्यापूर्वी त्या दोघांनी सलमान खानच्या घराची रेकी केली होती. पकडले जाऊ नये म्हणून मध्यरात्रीस त्यांनी ही रेकी केली होती.

सलमान खानच्या (Salman Khan ) घराबाहेर रात्री उशिरापर्यंत चाहत्यांची गर्दी असते. त्यामुळे त्यांनी पहाटे- पहाटे हा गोळीबार करण्याचा प्लॅन केला होता. गोळीबार झाल्यानंतर ते दोघेही गुजरातला पळून गेले होते. परंतु पोलिसांना त्या दोन आरोपीयांना अटक करण्यात यश आलेले आहे.

नक्की काय घडलेलं? | Salman Khan

रविवारी पहाटे सलमान खानच्या बांद्राच्या घराबाहेर गोळीबाराची ही घटना घडली. पहाटे सुमारे साडेचारच्या सुमारास सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटच्या बाहेर बाइकवरून दोन लोक गेले. त्यांनतर त्यांनी पाच ते सहा राउंड फायर केले. यावेळी सलमान खानच्या गॅलरीवरही गोळी झाडण्यात आली. हे दोन लोक गाडीवर होते. त्यांनी हेल्मेट घातल्यामुळे त्यांचा चेहरा झाकलेला होता. परंतु पोलिसांनी याबाबत 50 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्याची पडताळणी केली आहे. त्यानंतर त्यांची ओळख पटवून त्या दोघांना गुजरातमध्ये आता अटक देखील करण्यात यश आलेले आहे.