हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मराठा आरक्षणाच्या मुद्यांवरुन खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पुन्हा राज्य सरकारवर टीकेची तोफ डागली आहे. त्यांनी आक्रमक पावित्रा घेतला असून आता पुन्हा आपण राज्य सरकारविरोधात रायगडपासून पुन्हा राज्याचा दौरा करणार असल्याचे सांगितले आहे. राज्य सरकारने जे काही आश्वासन दिले होते. ते त्यांनी पाळलेले नाही. त्यांनी आश्वासन पाळले नाही म्हणून आपण आता 25 ऑक्टोबर पासून हा दौरा काढणार असल्याचे संभाजीराजे यांनी म्हंटल आहे.
खासदार संभाजीराजे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, राज्य सरकारकडून त्यांना राज्याची देण्यात आलेली जबाबदारी पाळली जात नसल्याचे दिसत आहे. सरकारला अल्टिमेटम दिलं होतं पण त्यानंतर त्यांनी आश्वासन पाळले नाहीत. त्यामुळे आरक्षणास इतर केलेल्या मागण्यांच्या प्रश्नी आता चर्चेला जाण्याचा विषयच नाही, आता आणखी काय चर्चा करायची.
मराठा आरक्षणाच्या प्रश्नी आम्ही राज्य सरकारकडेकाही महत्वपूर्ण मागण्या केलेलया होत्या. त्या मागण्यांमध्ये राज्य सरकारने सारथी सोडले तर इतर मुद्द्यावर व मागण्यांवर दिलेले आश्वासन पाळलेले नाही. त्यामुळे आता पुन्हा आपण 25 ऑक्टोबर पासून दौरा काढणार असल्याचे संभाजीराजे यांनी म्हंटल आहे.