हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील राज्यांना मागासवर्ग निश्चितीचा अधिकार बहाल करणारे घटनादुरुस्ती विधेयक दोनतृतीयांश मतांनी मंगळवारी लोकसभेत मंजूर करण्यात आले. आज हे विधेयक राज्यसभेत चर्चेसाठी सादर केले जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी राज्य व केंद्र सरकारकडे मागणी केली आहे कि, राज्य व केंद्र सरकारने मराठा समाजाला आरक्षण देताना ते टिकणारे द्यावे.
मराठा आरक्षणावरुन काल लोकसभेत चर्चा करण्यात आली. यावेळी भाजपचे मंत्री वगळता या चर्चेत महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनी सहभाग घेत राज्य सरकारच्यावतीने मराठा समाजबांधवांची बाजू मांडली. यावेळी झालेल्या चर्चेनंतर विधेयकावर मतदान घेण्यात आले. यात विधेयकाच्या बाजूने 386 तर विरोधात शुन्य मते पडली. त्यानुसार अधिवेशनात एसईबीसी नवे प्रवर्ग निर्माण करण्याचे अधिकार राज्य सरकारांना बहाल करणारे विधेयक मंजूर करण्यात आले.
याबाबत भाजपचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले कि, शाहू महाराजांनी जे जे वंचित आहेत त्यासर्वांना आरक्षण मिळणे गरजेचे आहे. आम्हाला राज्यसभेमध्ये मागासवर्ग निश्चितीचा अधिकार बहाल करणाऱ्या घटनादुरुस्ती विधेयकासंदर्भात बोलण्याची संधी द्यावी, असे पत्र राज्यसभेचे सभापती असणाऱ्या उपराष्ट्रपतींना पाठवल्याले आहे.