मुख्यमंत्र्यांशी माझी सविस्तर चर्चा, पुढं काय करायचं ते आमचं ठरलंय..; संभाजीराजेंचं महत्वाचं विधान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संभाजीराजे छत्रपती यांना शिवसेनेच्या प्रवेशाची अट घालत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवबंधन बांधण्यासाठी ‘वर्षा’ निवासस्थानी आमंत्रितही केले होते. मात्र, त्यांनी ते नाकारत थेट कोल्हापूर गाठले. यानंतर त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधत महत्वाचे विधानही केले. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी काल माझी सविस्तर चर्चा झाली आहे. पुढे काय करायचं ते ठरलं आहे. मला खात्री आहे कि ते छत्रपती घराण्याचा नक्कीच सन्मान करतील याची मला खात्री आहे, असे महत्वाचे विधान संभाजीराजेंनी केले.

संभाजीराजे छत्रपती यांनी आज कोल्हापुरात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, मला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याचा निरोप मिळाला होता. त्यानंतर मी काल मुख्यमंत्र्यांशी फोन द्वारे सविस्तर चर्चाही केली. या चर्चेदरम्यान आमच्यात उमेदवारी संदर्भात बोलणेही झाले. मी त्यांच्याकडे माझ्या भूमिकेबाबत सांगितले आहे. आता मला आशा आहे कि ते छत्रपती घराण्याचा नक्कीच सन्मान करतील, अशी प्रतिक्रिया संभाजीराजे यांनी दिली आहे.

काल शिवसेनेच्या शिष्टमंडळाने संभाजीराजेंची भेट घेत त्यांच्याशी जवळपास तासभर चर्चा करत त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला होता. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे व शिवसेना नेते संजय राऊत यांनीही संभाजीराजेंना फोन करून आज दुपारी 12 वाजता ‘वर्षा’ या निवासस्थानी शिवबंधन बांधण्यासाठी आमंत्रित केले होते. मात्र, संभाजीराजेंनी उद्धव ठाकरेंच्या निमंत्रणाकडे पाठ फिरवत थेट कोल्हापूरकडे जाणे पसंद केले. मात्र, काल दिवसभरात संभाजीराजेंनी मुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चा केली आहे.

शिवबंधन बांधणार?

कोल्हापुरातून आज पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्याची माहिती दिली. त्यांनी मुख्यमंत्र्यांकडून छत्रपती घराण्याचा सन्मान राखतील, अशी आशाही व्यक्त केली. त्यानंतर आता ते पुन्हा मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत. शिवसेनेत प्रवेश करावा असा दबाव त्यांच्यावर वाढला असल्यामुळे अशात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे वर्तवलेल्या आशेनंतर आज संभाजीराजे हातावर शिवबंधन बांधणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. तसेच शिवसेनेचे उमेदवार म्हणून संभाजीराजे राज्यसभा उमेदवारी दाखल करणार असल्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Leave a Comment