व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

उद्धव ठाकरेंच्या पार्टनरचे ‘कसाब’ सोबत संबंध; किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप

हेमंत करकरेंना देण्यात आलेले बुलेटप्रूफ जॅकेट बोगस

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे. नवाब मलिकांवरील आरोप केल्यानंतर आता सोमय्यांनी उद्धव ठाकरेंच्या पार्टनरचे कसाबशी संबंध असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

किरीट सोमय्यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, उद्धव ठाकरे, शिवसेना आणि महाविकास आघाडीतीळ नेत्यांचे मुंबई हल्ल्यातील आरोपी व दहशतवादी अजमल कसाबसोबत संबंध आहेत. आता मुख्यमंत्र्यांनी सांगावे की, ते कुणाकुणाचे पार्टनर आहेत? तसेच यशवंत जाधव आणि ठाकरे परिवारांचे कोणते आर्थिक संबंध आहेत?

यावेळी सोमय्या यांनी 26 नोव्हेंबर रोजीच्या हल्ल्यावेळी काही घडलेल्या अनेक गोष्टीबाबत माहितीही दिली. सोमय्या म्हणाले की, शहीद हेमंत करकरे यांना हल्ल्याच्यावेळी जे बुलेटप्रूफ जॅकेट देण्यात आले होते ते बोगस होते. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. हे जॅकेट बिमल अग्रवाल यांनी पुरवले होते. यशवंत जाधव यांच्यावर ज्यावेळी धाड टाकण्यात आली त्यावेळी बिमल अग्रवाल यांचे नाव पुढे आले होते,” असे किरीट सोमय्या यांनी म्हंटले आहे.