हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे दि. 6 डिसेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यासाठी किल्ले रायगडावर येणार आहेत. मात्र, रायगडावरील होळीच्या माळावर बनवण्यात येणाऱ्या हेलिपॅडला काही शिवप्रेमींनी विरोध केला आहे. शिवप्रेमींच्या विरोधानंतर राष्ट्रपती कोविंद कसे येणार याबाबत प्रश्न उपस्थित केले जात असताना खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी ट्विट करीत महत्वाची माहिती दिली आहे. “राष्ट्रपती रोपवेने रायगडावर येणार आहेत,” असे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी म्हंटले आहे.
संभाजीराचे छत्रपतींनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे की, “छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी कोणत्याही परिसथितीत दुर्गराज रायगडावर येण्याची इच्छा राष्ट्रपती महोदयांनी व्यक्त केली आहे. यासाठी शिवभक्तांच्या भावनेचा आदर राखत ते गडावर रोपवेने येणार आहेत. राष्ट्रपती महोदयांच्या या शिवभक्तीस मी सल्यूट करतो,”असे ट्विट त्यांनी केले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी कोणत्याही परिसथितीत दुर्गराज रायगडावर येण्याची इच्छा राष्ट्रपती महोदयांनी व्यक्त केली आहे. यासाठी शिवभक्तांच्या भावनेचा आदर राखत ते गडावर रोपवेने येणार आहेत. राष्ट्रपती महोदयांच्या या शिवभक्तीस मी सल्यूट करतो.@rashtrapatibhvn
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) December 4, 2021
देशाचे राष्ट्रपती महाराजांना अभिवादन करणार असल्याने याबाबात खासदार संभाजीराजे यांनी महत्वाची माहिती दिली आहे. “मी महाराजांचा वंशज आहे. गडावरती काहीही चुकीचे होऊ देणार नाही. रायगडावरील रोप वे सक्षम नसल्यानेच गडावरती हेलिकॉप्टर उतरावे लागत आहे. रोप सक्षम नसल्याचा दाखला महाराष्ट्र सरकारनेच दिला आहे. त्यामुळे गडावर हेलिपॅड बनवावे लागले. होळीच्या माळावर असलेल्या महाराजांच्या पुतळ्यावर धुळ जाणार नाही याची योग्य खबरदारी घेतली आहे. शिवनेरी किल्ल्यावर हेलिकॉप्टर उतरते तेव्हा धुळ उडलेली चालते आणि रायगडावर काळजी घेतली तरी चर्चा का? असा सवाल संभाजीराजे यांनी विचारला आहे.