तुझं – माझं न करता एकत्र येऊन मराठा समाजाला न्याय देऊ; संभाजीराजेंची फडणवीसांना विनंती

fadanvis sambhaji raje
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणासाठी छत्रपती संभाजीराजे यांनी जोरदार पुढाकार घेतला असून समाजाची भावना जाणून घेण्यासाठी ते सध्या राज्यभर दौरा करत आहेत. यादरम्यान त्यांनी शरद पवार आणि राज ठाकरे यांच्या नंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन याबाबत चर्चा केली. तुझं – माझं न करता एकत्र येऊन मराठा समाजाला न्याय देऊ अस आवाहन यावेळी संभाजीराजे यांनी केलं.

समाज अस्वस्थ आहे. मराठा समाजाची परिस्थिती वाईट आहे. या समाजाला न्याय मिळवून दिला नाही तर आपण सर्वजण जबाबदार असू. आपण या समाजाला न्याय देण्यासाठी राजकारणापलिकडे पाहायला हवं. त्यासाठी मुख्यमंत्री – विरोधी पक्ष नेते यांनी सर्वांनी एकत्र यायला हवं असे संभाजीराजे यांनी म्हंटल.

तुझं – माझं न करता एकत्र येऊन मराठा समाजाला न्याय देऊ. आपण एकत्र आलो नाही आणि समाजाला न्याय दिला नाही  तर जे काही समाजाचं होईल, त्यासाठी माझ्यासह तुम्ही-आम्ही सर्व आमदार खासदार सर्व जबाबदार असतील”, असं मी देवेंद्र फडणवीस यांना सांगितलं, असं संभाजीराजे छत्रपती म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.