हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यात राजकीय वातावरण पुन्हा एकदा गरम झालं. याच मुद्द्यावरून राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजप मध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैली झडत आहेत. दरम्यान खासदार छत्रपती संभाजीराजे हे सातत्याने मराठा आरक्षणासाठी पुढाकार घेत असून राज्यभर दौरा करत आहेत. आता ते वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भेट घेणार आहेत.
प्रकाश आंबेडकर यांची आज खासदार छत्रपती संभाजीराजे भेट घेणार आहेत. पुणे येथील त्यांच्या निवासस्थानी सायंकाळी ४ वाजता ही भेट होणार आहे. या भेटी दरम्यान मराठा आरक्षणावर चर्चा होणार आहे. यापूर्वी संभाजीराजे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती.
पवारांसोबत सकारात्मक चर्चा- संभाजीराजे
दरम्यान मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली असून मराठा समाज किती अस्वस्थ आहे, किती दु:खी आहे. तसंच मराठा समाजाच्या परिस्थितीची कल्पना शरद पवारांना दिली. तुम्ही पुढाकार घ्यावा अशी मी विनंती केली असून मुख्यमंत्री, विरोधी पक्ष, नारायण राणे यांना एकत्र आणलं पाहिजे असा आग्रह केला,” अशी माहिती संभाजीराजे यांनी दिली.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.