समृद्धी महामार्गावर अपघातांचे सत्र सुरूच! रुग्णवाहिकेने कारला धडक दिल्यामुळे एकाचा मृत्यू; 9 जण गंभीर जखमी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सतत होणाऱ्या अपघातांच्या कारणांमुळे समृद्धी महामार्ग नेहमी चर्चेचा भाग राहिला आहे. आता पुन्हा एकदा याच महामार्गावर भीषण अपघात घडल्याची बातमी समोर आली आहे. समृद्धी महामार्ग रुग्णवाहिकेने एका कारला जोरदार धडक दिल्यामुळे एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे. तसेच, नऊजण गंभीर जखमी झाले आहेत. सध्या यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. तसेच, या सर्व घटनेचा तपास पोलीस करत असून त्यांनी जखमी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, हा अपघात समृद्धी महामार्गावर वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील वनोजा ते कवरदरी दरम्यान झाला आहे. या अपघातात एका रुग्णवाहिकेने कारला जोरदार धडक दिली आहे. ज्यामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून नऊजण गंभीर जखमी झाले आहेत. तर यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. मुख्य म्हणजे, हा अपघात झाल्यानंतर काही वेळासाठी समृद्धी महामार्गावरील वाहतूक खोळंबली होती. परंतु पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तीला पुन्हा सुरळीत केले.

अपघात कसा झाला?

सांगितले जात आहे की, जखमी पुनीत नांदेलवार यांचे कुटुंब नागपुरवरून मुंबईला आपल्या कारने निघाले होते. तर, भरधाव रुग्णवाहिका नागपूरवरून सुरतला उपचारासाठी रुग्ण घेऊन चालली होती. परंतु याच दरम्यान वाशिम जिल्ह्यातील वनोजा ते कवरदरी येथे आल्यानंतर रुग्णवाहिकेने कारला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात रुग्णवाहिकेतील मोहिनी आभडे यांचा मृत्यू झाला. तर कारमधील पुनीत नांदेवाल, शालू नांदेवाल, आरव नांदेवाल आणि पायल नांदेवाल असे चारजण गंभीर जखमी झाले. यासोबत रुग्णवाहिकेत असणारे मोहनिश भोनेवाला, चालक प्रदीप कुमार बोहरा, सौम्या बोहरा, राकेश भोनेवाला आणि वीरेंद्र पाल यांना देखील गंभीर दुखापत झाली. त्यामुळे सध्या या सर्वांवर जवळील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.