हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्य सरकारने किराणामालाच्या दुकानांमध्ये वाईन विक्रीला परवानगी दिल्यानंतर विरोधकांकडून राज्य सरकावर टीका केली जाऊ लागली आहे. दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवरही निशाणा साधला. त्यांच्यानंतर आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनी राज्यशिवसेना खासदार संजय राऊत याच्यावर टीका केली. मनसे नेते राज ठाकरे यांच्यावर कोरोनाच्या काळात टीका करणारा अग्रलेख लिहिण्याऱ्या “संजय” ला आता दिव्यदृष्टी प्राप्त झाली का?, असे देशपांडे यांनी म्हंटले.
राज्य सरकारने किराणा दुकानात वाईनला परवानगी देण्याचा निर्णय घेतल्याने यावरून राजकीय वाटेवर चांगलेच तापले आहे. यावरून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट करीत शिवसेना खासदार संजय राऊत याच्यावर निशाणा साधला आहे. देशपांडेंनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, “कोरोनाच्या पहिल्या लाटे मध्ये जेव्हा राजसाहेबांनी वाईन शॉप चालू करा कारण सरकारचा महसूल बुडतो आहे हे सांगितलं होतं. त्यावेळेला साहेबांवर टीका करणारा अग्रलेख लिहिण्याऱ्या “संजय” ला आता दिव्यदृष्टी प्राप्त झाली का?,”
करोना च्या पहिल्या लाटे मध्ये जेव्हां राजसाहेबांनी वाईन शॉप चालू करा कारण सरकारचा महसूल बुडतो आहे हे सांगितलं होतं. त्यावेळेला साहेबांवर टीका करणारा अग्रलेख लिहिण्याऱ्या "संजय" ला आता दिव्यदृष्टी प्राप्त झाली का?
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) January 31, 2022
देशपांडे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेसाहेब यांनी कोरोना काळात मद्यशॉप सुरू करा सूचना केली होती. राज्याचा महसूल वाढवा यासाठी ते बोलले होते. त्यावेळी मातरम त्याच्यावर टीका करण्यात आली होती. राज ठाकरे यांच्यावर टीका करणारा तो अग्रलेख ऑनलाईन का काढण्यात आला? असा सवालही संदीप देशपांडे यांनी यावेळी राऊतांना विचारला आहे.