हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज पहाटे मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर मॉर्निंग वॉक दरम्यान हल्ला करण्यात आला. हल्ल्यानंतर त्यांना हिंदुजा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. हल्ल्यानंतर त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. “असे कितीही हल्ले झाले तरी आम्ही कुणाला घाबरत नाही. हल्ल कुणी केला हे सर्वांना माहिती आहे,” असे देशपांडे यांनी म्हंटले.
हल्ला झाल्यानंतर संदीप देशपांडे यांना रुग्नालयात दाखल करण्यात आले. या ठिकाणी उपचार केल्यानंतर त्यानाच डिस्चार्ज देण्यात आला. रुग्णालयातून बाहेर आल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी हल्लेखोरांबाबत आपली प्रतिक्रिया दिली.
आज सकाळी मॉर्निंग वॉकला गेल्यावर देशपांडे यांच्यावर शिवाजी पार्क येथे मास्क घालून आलेल्या हल्लेखोरांनी हल्ला केला. या घटनेची माहिती मिळताच मनसे अध्यक्ष राज ठाकरे व अमित ठाकरे यांनी रुग्णालयात जाऊन देशपांडे यांची भेट घेतली.
देशपांडेच्या हल्ल्यामागे ठाकरे, राऊतांचा हात : अमेय खोपकर
संदीप देशपांडे यांच्या हल्ल्यामागे आदित्य ठाकरे आणि संजय राऊत या दोघान्चा हात आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्काळ या दोघांना अटक करण्याचे आदेश द्यावे, अशी मागणी मनसे चित्रपट सेनेचे नेते अमेय खोपकर यांनी केली आहे.