Tuesday, February 7, 2023

सांगली जिल्हाधिकाऱ्यांची महापौरांकडे नाराजी ः महापालिकेचा ऑक्सिजन प्लांट उभारण्यास विलंब

- Advertisement -

सांगली | जिल्ह्यासह महापालिका क्षेत्रास कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. ऑक्सिजन, व्हेंटीलेटरर्सची कमतरता भासत आहे. तरीही पालिका प्रशासान ऑक्सिजन प्लांट बसवण्यास का विलंब लावत आहे. या विलंबामुळे जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी महापौर दिग्वीजय सुर्यवंशी यांच्याकडे तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

ऑक्सिजन, व्हेंटीलेटरर्स अभावी अनेक रुग्णांचा जीव टांगणीला आहे. जिल्हा प्रशसान हरतऱ्हेचे प्रयत्न करून ऑक्सिजन व व्हेंटीलेटर मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र महापालिका याच कामात काहीच मदत करताना दिसत नाही. पदाधिकारी, नगरसेकांच्या दबावामुळे पालिका प्रशासाने ऑक्सिजन प्लांट बसवण्याचा व व्हेंटीलेटरर्स खरेदीचा निर्णय घेतला.

- Advertisement -

मात्र पालिकेकडून निविदा काढण्याच्या नावाखाली प्रशासनानकडून विलंब होत आहे. याप्रकरणी जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी महापौर दिग्वीजय सुर्यवंशी यांच्याकडे तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. महापौरानाही याबाबत प्रशासनाकडे बोट केल असून काही अधिकाऱ्यांमुळे या कामात विलंब होत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनीच संबधीत अधिकाऱ्यांना समज द्यावी, अशी मागणी महापौरांनी केली.