हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । T20 World Cup 2024 स्पर्धा १ जूनपासून सुरु होणार असून भारतीय निवड समितीने अद्याप संघाची घोषणा केली नाही. मात्र अनेक माजी क्रिकेटपटू आपापल्या परीने १५ जणांच्या संघ निवडत आहेत. यापूर्वी इरफान पठाण आणि हरभजन सिंगने विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघ कसा असावा याबाबत मत व्यक्त केलं होते. आता भारताचा माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर (Sanjay Manjarekar) यांनी टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघातील 15 जणांची निवड केली आहे. मात्र त्यांनी या संघात दिग्गज फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) आणि अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याला (Hardik Pandya) स्थान दिलेलं नाही. त्यामुळे सर्वच जण चकित झालेत.
मांजरेकरांच्या संघात कोणाकोणाला स्थान –
संजय मांजरेकर यांनी आपल्या संघात सलामीवीर म्हणून रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वालची निवड केली आहे. तर तिसऱ्या क्रमांकाच्या फलंदाजीसाठी केएल राहुलला पसंती दिली आहे. धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादवची चौथ्या क्रमांकावर निवड करण्यात आली आहे. तर मांजरेकरांनी २ विकेटकिपर फलंदाजांना प्राधान्य दिले आहे. हे दोन्ही यष्टीरक्षक म्हणजे ऋषभ पंत आणि संजू सॅमसन.. ..याशिवाय अष्टपैलू खेळाडू म्हणून त्यांनी कृणाल पांड्या आणि रवींद्र जडेजा या दोघांची निवड केली आहे. यावेळी त्यांनी हार्दिक पंड्या आणि शिवम दुबे याना डच्चू दिलाय.
Sanjay Manjrekar picks India's squad for the 2024 T20 World Cup. (Star Sports). pic.twitter.com/31cUdgZ2Cg
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 26, 2024
गोलंदाजीच्या बाबतीत सांगायचं झाल्यास, कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल या २ फिरकीपटूंना संजय मांजरेकर यांनी आपल्या संघात स्थान दिले आहे. तर जसप्रीत बुमराह, आवेश खान, मोहम्मद सिराज, मयंक यादव आणि हर्षित राणा असा जलदगती गोलंदाजांचा तगडा मांजरेकरानी आपल्या संघात सामील कला आहे.
संजय मांजरेकरांनी निवडलेला संघ पुढील प्रमाणे आहे-
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, कृणाल पांड्या, ऋषभ पंत, संजू सॅमसन, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, आवेश खान, मोहम्मद सिराज, मयंक यादवं, हर्षित राणा