हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल पत्रकार परिषद घेत विविध विषयावर आपली परखड मतं माध्यमांसमोर मांडली होती.फक्त आपल्याच राज्यात कोरोना का वाढतोय.या प्रश्नावर उत्तर देताना राज ठाकरे म्हणाले होते “की मुंबईत आणि महाराष्ट्रात रुग्ण वाढायच्या बऱ्याच कारणापैकी एक महत्वाचे कारण म्हणजे परप्रांतीयांचे दररोज येणारे लोंढे.या दररोज येणाऱ्या परप्रांतीय लोकांमुळेच राज्यात कोरोणा वाढत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले होते.
यावर काँग्रेस नेते माजी खासदार संजय निरुपम यांनी ट्विटच्या माध्यमातून टीका केली आहे.निरुपम यांनी राज ठाकरे यांच्या वक्तव्याचा बातमीचा फोटो शेयर करतं. बहिरा नाचे आपन ताल ! या अवधी – भोजपुरी म्हणीचं कॅप्शन दिले आहे.खास आपल्या संपादकीय शैलीचा वापर करत निरुपम यांनी राज यांच्या वक्तव्याचा चांगलाच कमी शब्दात पण खरपूस समाचार घेतला आहे.यावर अजून कुठ्ल्याही मनसे नेत्याने पलटवार केला नाहीये.पण मनसे कडून येणारी प्रतिक्रिया नक्कीच पाहण्यालायक असेल यात अजिबात शंका नाही.
बहिरा नाचे आपन ताल ! pic.twitter.com/5QMkF2ijyB
— Sanjay Nirupam (@sanjaynirupam) April 7, 2021
दरम्यान, राज ठाकरे यांच्या नेतृत्वावर प्रश्न चिन्ह निर्माण करणार ब्लॉग “चपराक” चे संपादक घनशाम पाटील यांनी लिहिला होता.त्यावर बरेच वाद – विवाद उठले आहेत.अनेक मनसे सैनिकांनी तर “पाटला तू यापुढे सांभाळून रहा” अशा धमक्या सुद्धा दिल्या आहेत.या प्रकरणावर पुढे काय होतं हे सुद्धा पाहणे औत्सुक्याचे ठरेल.