हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एकनाथ शिंदे यांच्या सोबत बंडखोर आमदार सुरतला गेल्यानंतर मी, गुलाबराव पाटील आणि दादा भुसे यांनी उद्धव ठाकरेंना आमचं म्हणणं पटवून दिले होते. त्याला आम्हांला यशही आले होते. पण त्यानंतर संजय राऊत विरोधात बोलू लागले आणि आमच्यावर टीका करू लागले. त्यांनीच कळ लावली असा आरोप संजय राठोड यांनी केला.
संजय राठोड यांनी त्या दिवसाचा घटनाक्रम सांगताना म्हंटल की, उद्धव ठाकरे यांना आम्ही समजावलं होत. बंडखोर आमदारांना सुरतला भेटण्यासाठी ते आदित्य ठाकरे यांना पाठवायला तयार झाले होते. मात्र तेव्हाच संजय राऊत आमच्या विरोधात बोलू लागले. आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंनी रवींद्र फाटक आणि मिलिंद नार्वेकर यांना सुरतला पाठवले. संजय राऊत यांच्यामुळे आदित्य ठाकरे आणि बंडखोर आमदारांची भेट होऊ शकली नाही असे संजय राठोड यांनी सांगितले.
आत्तापर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासात शिवसेना जेव्हा जेव्हा फोडली तेव्हा तेव्हा ती राष्ट्रवादी काँग्रेसनेच फोडली आहे. फरक एवढाच आहे की आतापर्यंत बाहेर राहून फोडली, आता सोबत राहून फोडली. यावेळी खासदार संजय राऊत यांच्या मदतीने शिवसेना फोडल्याचा आरोपही संजय राठोड यांनी केला.